agriculture news in marathi Ahmednagar ZP to fine people on spitting | Page 2 ||| Agrowon

पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर झेडपीचा निर्णय

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 मे 2020

सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास नगर जिल्हा परिषदेच्या लेखी प्रतिपादन सभेत मंजुरी मिळाली. 

नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा परिषदेच्या लेखी प्रतिपादन सभेत मंजुरी मिळाली. त्यामुळे आता १५ दिवसांत सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू होणार आहे.

सार्वजनिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. ठरावाला जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लेखी प्रतिपादन सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता हा ठराव ग्रामपंचायतींकडे पाठवून त्यांच्याकडून त्यावर हरकती मागविण्यात येणार आहेत. गावा-गावांतून आलेल्या हरकतींवर (हरकती नकारात्मक आल्यास) सुनावणी होऊन त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे हा ठराव कार्योत्तर मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करून त्याची अंमलबजावणी होणार आहे. ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५० रुपये दंड आकारला जाणार आहे. सभेत ७२ जिल्हा परिषद सदस्य व १३ पंचायत समितीचे सभापती, अशा एकूण ८५ पैकी ८४ जणांची मते पडली. एका सदस्याने त्रयस्थ भूमिका घेतली. 


इतर बातम्या
सीईटीऐवजी गुणांद्वारे कृषी...अमरावती ः बारावीनंतर कृषी अभ्यासक्रमाला...
वीजबिले माफ न केल्यास कंपनीचे कार्यालय...बुलडाणा ः लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्यांचे...
सत्तास्थापनेसाठी भाजपकडूनच विचारणा केली...मुंबई : सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन...
वऱ्हाडात दूधाचे दर स्थिरअकोला ः या भागातील दूध संघ डबघाईस आल्याने दूध...
वाशीम जिल्ह्यावर खरिपात पावसाची कृपावाशीम ः जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत...
वर्धा जिल्ह्यात दूध उत्पादकांना दराचा...नागपूर ः लॉकडाउनमुळे मागणी घटल्याचे सांगत खासगी...
नाशिकमध्ये कमी दूध दरामुळे उत्पादकांची...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार...
वीज बिले माफ न केल्यास उद्रेक ः...नाशिक : लॉकडाऊन काळात वीज कंपन्यांनी घरगुती वीज...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश;तरीही चार...पुणे: पंतप्रधान पॅकेजमधून राबविण्यात आलेल्या...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...
दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी...पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध...
राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत...
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...