सांगली जिल्ह्यात मदतीसाठी आला १०९ कोटींवर निधी

aid came 109 crore in the Sangli district
aid came 109 crore in the Sangli district

सांगली : ‘‘ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात १ लाख ९५ हजार २१२ इतक्या शेतकऱ्यांच्या १ लाख ८ हजार ९९४.६२ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. त्यासाठी एकूण १०९ कोटी ८३ लाख ३५ हजार रुपयांची मदत प्राप्त झाली. हे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर वाटप करण्यात येत आहे,’’ अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाने सर्वदूर दमदार हजेरी लावली. यामुळे द्राक्ष, डाळिंबांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बाधित पिकांचे पंचमाने करून यादी वरिष्ठ कार्यालयात सादर केली होती. त्यानुसार नुकसानभरपाई मिळाली आहे.

जिल्ह्यासाठी १०९ कोटी ८३ लाखाचे अनुदान मिळाले आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जुलै-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पूर्णतः नष्ट व मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली ९ हजार ४८५  पक्की व कच्ची घरे, अंशतः किमान १५ टक्के पडझड झालेली १२ हजार ११८ पक्की व कच्ची घरे आदींच्या नुकसानीपोटी एकूण १०२ कोटी ५१ लाख ७८ हजार ९०० रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे. यापैकी महापालिका क्षेत्रातील नुकसानग्रस्त घरांसाठी महापालिकेस ४ कोटी ९२ लाख  १४ हजार १०० रुपये इतके, तर ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त घरांसाठी जिल्हा परिषद यंत्रणेस ९२ कोटी ५७ लाख १ हजार इतके अनुदान वाटप करण्यासाठी वितरित करण्यात आले. 

लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर हे अनुदान वाटप करण्याचे कामकाज सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सर्व बँकांची बैठक घेऊन अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर तात्काळ जमा करण्याचे आदेश दिले.

तालुकानिहाय वितरित अनुदान

तालुका  अनुदान रक्कम
मिरज  ११ कोटी २७ लाख
वाळवा २ कोटी ७१ लाख ४७ हजार
शिराळा  २१ लाख २६ हजार 
पलूस २ कोटी ८७ लाख ४७ हजार
तासगाव  ३१ कोटी ५४ लाख २८ हजार
कडेगाव २ कोटी ६७ लाख ३५ हजार 
खानापूर १३ कोटी ५० लाख
आटपाडी ७ कोटी ७१ लाख ६० हजार 
कवठेमहांकाळ २१ कोटी ४७ लाख 
जत १५ कोटी ८५ लाख ८९ हजार 
एकूण १०९ कोटी ८३ लाख ३५ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com