हिंगोली जिल्ह्यात पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण

हिंगोली जिल्ह्यात पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण
हिंगोली जिल्ह्यात पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप हंगामात ५६ हजार ८०६ शेतकऱ्यांना २७३ कोटी १८ लाख ८१ हजार रुपये (२८.४९ टक्के) आणि रब्बी हंगामात १० हजार २४६ शेतकऱ्यांना ६९ कोटी ७५ लाख ५३ हजार रुपये (४३.८७ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले. जिल्ह्यातील बॅंकांचे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले आहे.

हिंगोली जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंकांना एकूण ९५९ कोटी रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात राष्ट्रीयीकृत बॅंकांना ६१७ कोटी रुपये उद्दिष्ट असताना १७ हजार ४१५ शेतकऱ्यांना १४० कोटी ४५ लाख १६ हजार रुपये (२२.७६ टक्के), खासगी बॅंकांना ८० कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात २ हजार ७९८ शेतकऱ्यांना २४ कोटी ३८ लाख ९४ हजार रुपये (३०.४९ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १२६ कोटी रुपये उद्दिष्ट असताना ८ हजार १७६ शेतकऱ्यांना ५५ कोटी ४६ लाख ९३ हजार रुपये (४४.०२ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १३६ कोटी रुपये उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ५२ कोटी ८७ लाख ७८ हजार रुपये (३८.८८ टक्के) असे एकूण ५६ हजार ८०६ शेतकऱ्यांना २७३ कोटी १८ लाख ८१ हजार रुपये (२८.४९ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले.

रब्बी हंगामात एकूण १५९ कोटी रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. राष्ट्रीयीकृत बॅंकांना १०९ कोटी ५० लाख रुपये उद्दिष्ट असताना ४ हजार ७२ शेतकऱ्यांना ३४ कोटी १९ लाख २७ हजार रुपये पीक कर्जवाटप केले. खासगी बॅंकांना ८ कोटी ५० हजार रुपये उद्दिष्ट असताना १ हजार ३१७ शेतकऱ्यांना २० कोटी ३८ लाख ८१ हजार रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या २३९ टक्के कर्जवाटप केले.

केवळ ६९ कोटींचे कर्जवाटप सर्व बॅंकांना १५९ कोटी रुपये उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १० हजार २४६ शेतकऱ्यांना ६९ कोटी ७५ लाख ५३ हजार रुपये (४३.८७ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com