पूर्ण कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट : शेटे

नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याने जुन्या झालेल्या मशिनरी दुरुस्ती व बदल करताना टप्याटप्याने मशिनरी अधिक कार्यक्षमतेच्या टाकल्या. त्यामुळे गाळप कार्यक्षमता वाढली आहे.
Aim to grind sugarcane at full efficiency: Shete
Aim to grind sugarcane at full efficiency: Shete

नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याने जुन्या झालेल्या मशिनरी दुरुस्ती व बदल करताना टप्याटप्याने मशिनरी अधिक कार्यक्षमतेच्या टाकल्या. त्यामुळे गाळप कार्यक्षमता वाढली आहे. त्यातच नुकतेच शासनाने २५०० मेट्रिक टन दैनिक गाळप क्षमतेस परवानगी दिली आहे. त्यादृष्टीने मशिनरी देखभाल दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. पुरेशी ऊसतोड कामगार भरती करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पूर्ण कार्यक्षमतेने जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे,’’असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले. 

कारखान्याचे गळीत हंगाम तयारी अंतर्गत मिलरोलर पूजन नुकतेच शेटे यांचे हस्ते झाले. उपाध्यक्ष उत्तम भालेराव, संचालक मधुकर गटकळ, दिनकर जाधव, सुकदेव जाधव, शहाजी सोमवंशी, मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, बापू पडोळ, विश्वनाथ देशमुख, संपत कोंड, बबनराव देशमुख, रघुनाथ जाधव, युनियन अध्यक्ष दत्तात्रय वाकचौरे, युनियन पदाधिकारी, अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शेटे म्हणाले, ‘‘कादवाची उसाची एफआरपी सर्वाधिक असून पूर्ण एफआरपी अदा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कादवाला ऊस देण्याचा कल वाढलेला आहे. सर्वच शेतकऱ्यांची लवकरात लवकर ऊस तोड व्हावी ही अपेक्षा असते;परंतु कादवाची गाळप क्षमता कमी असल्याने सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नव्हत्या म्हणूनच सांगत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी.’’ आभार कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी मानले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com