agriculture news in marathi Aim to procure 35,000 quintals of maize in Jalna district | Page 3 ||| Agrowon

जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान आधारभूत किमतीने खरेदी केली जाणार आहे. या सर्व केंद्रांना ३५ हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे,’’ अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विमल वाघमारे यांनी दिली.

जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान आधारभूत किमतीने खरेदी केली जाणार आहे. या सर्व केंद्रांना ३५ हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे,’’ अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विमल वाघमारे यांनी दिली.

मका खरेदीला राज्य शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जालना जिल्ह्यात जालना, भोकरदन, राजूर, जाफराबाद, माहोरा या पाच ठिकाणी मका खरेदी केंद्र देण्यात आले आहे. जिल्ह्याला मिळालेले ३५००० क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट या पाच केंद्रांना विभागून देण्यात आले आहे. त्यानुसार जालना केंद्रावर ३ हजार ३०० क्विंटल, भोकरदन केंद्रावर १५ हजार ३०० क्विंटल, राजूरच्या केंद्रावर २ हजार २०० क्विंटल, जाफराबादच्या केंद्रावर ५५०० क्विंटल, तर माहोराच्या केंद्राला ८ हजार ७०० क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट आहे. मका खरेदीची प्रक्रिया ३० जूनपर्यंत सुरू राहील.

उद्दिष्टापेक्षा जास्त खरेदी न करण्यासंबंधी सूचित करण्यात आले आहे. १४ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता आढळल्यास मका खरेदी करू नये, ओले व बुरशीयुक्त धान्य खरेदी करू नये, मक्याचा दर्जा तपासण्यासाठी प्रशिक्षित ग्रेडरची नियुक्ती करावी, शासन निर्णय त्यांच्या सर्व सूचनांचे पालन करत प्रतिक्विंटल १८५० रुपये दराने खरेदी करावी, असे स्पष्ट करण्यात आले. 

जालना जिल्ह्यासाठी मका, ज्वारी, गहू, हरभरा खरेदी करताना त्याची हेक्‍टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार रब्बीतील मका खरेदी करताना हेक्‍टरी ४ हजार ३९३ किलो, रब्बी ज्वारी हेक्टरी १२५३ किलो, गहू हेक्टरी २०९६ किलो, हरभरा हेक्टरी १२१२ किलो निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार खरेदी करण्याचे सूचित केले आहे, असे वाघमारे यांनी सांगितले. 

पीक कापणी प्रयोगाचे संकलन बाकी 

गेल्या रब्बी हंगामातील मका, ज्वारी, गहू व हरभरा पिकाचे पीक कापणी प्रयोगाचे संकलन बाकी आहे. त्यामुळे २०२०-२१ मधील उत्पादकतेमध्ये फरक पडू शकतो, असेही कृषी विभागाच्या वतीने कळविण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....
नांदेडमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे...नांदेड : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या...
खानदेशात सोयाबीन पेरणीत घटजळगाव : खानदेशात यंदा नापेर क्षेत्र यंदा वाढणार...
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...