agriculture news in Marathi, air distance problem study start, Maharashtra | Agrowon

हवाई अंतर समस्येच्या अभ्यासाला सुरवात

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पुणे : राज्यात दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यास साखर आयुक्तालयाने सुरवात झाली आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी हवाई अंतराचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यासाठी संघटनेने साखर आयुक्तालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे हवाई अंतराच्या मुद्द्याबाबत ठोस भूमिका आता राज्य शासनाला घ्यावी लागेल.

सरकारी टोलवाटोलवी करून आंदोलकांना माघारी पाठविण्याऐवजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मात्र या मुद्द्याचा सखोल अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कारखानदारांची उत्सुकता वाढली आहे.

पुणे : राज्यात दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यास साखर आयुक्तालयाने सुरवात झाली आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी हवाई अंतराचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यासाठी संघटनेने साखर आयुक्तालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे हवाई अंतराच्या मुद्द्याबाबत ठोस भूमिका आता राज्य शासनाला घ्यावी लागेल.

सरकारी टोलवाटोलवी करून आंदोलकांना माघारी पाठविण्याऐवजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मात्र या मुद्द्याचा सखोल अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कारखानदारांची उत्सुकता वाढली आहे.

‘‘हवाई अंतराच्या अभ्यासासाठी आयुक्तांनी सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनकडून या मुद्द्यावर मते मागविण्यात आलेली आहेत. याशिवाय अभ्यास गटात स्वतः रघुनाथदादांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे,’’ अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

‘‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी तातडीने देणार नसाल तर दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट काढून टाका. स्पर्धा झाल्यास शेतकऱ्यांना भाव मिळेल,’’ असा जोरदार युक्तिवाद शेतकरी संघटनेचा आहे. 

हवाई अंतराबाबत रंगराजन समिती काय म्हणते?
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे तत्कालीन अध्यक्ष सी. रंगराजन यांच्या शिफारशीनुसार, साखर क्षेत्र पूर्णतः नियंत्रण मुक्त व्हावे. दोन साखर कारखान्यांमध्ये कोणतीही हवाई अंतराची अट नको. त्यामुळे ऊस खरेदीसाठी साखर कारखानदारांवर असलेले बंधन दूर होईल. 

कायदा काय सांगतो?
ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या खंड सहा-क अनुसार दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतर १५ किलोमीटर हवे. तसेच, अंतर वाढविण्याचे अधिकार राज्य शासनाला असतील. 

राज्य शासनाची भूमिका
सध्याच्या साखर कारखान्यांना बळकट करण्यासाठी तसेच ऊस पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी दोन कारखान्यांमधील हवाई अंतराची अट २५ किलोमीटर करण्यात यावे. तसा निर्णय ३ डिसेंबर २०११ रोजी घेण्यात आला.

कोणत्या मुद्द्यांवर अभिप्राय मागविले

  • दोन साखर कारखान्यांमध्ये सध्या हवाई अंतराची अट २५ किलोमीटर आहे. ही अट रद्द करणे योग्य आहे का?
  • हवाई अंतराची अट रद्द होताच साखर उद्योगावर अनुकूल परिणाम कोणते होतील?
  • अट नसल्यामुळे साखर उद्योगावर प्रतिकूल परिणाम होतील का आणि कोणते?
     

इतर बातम्या
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
राज्यात सर्वदूर हलका पाऊसपुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी...जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी...