Agriculture news in marathi Airport barrier in the way of farmers | Agrowon

शेतकऱ्यांच्या वाटेत विमानतळाचा अडथळा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 जानेवारी 2020

जळगाव : नाइट लॅंडिंगसाठी विमानतळावरील धावपट्टीचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. यामुळे परिसरात नशिराबादच्या शेतकऱ्यांचे साधारण दोन ते अडीच हजार एकर जमीन जात आहे. धावपट्टीमुळे शेतात जाण्याचा मार्ग बंद करण्याचे नियोजन प्राधिकरणाचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना १२ ते १५ किलोमीटरचा फेरा पडणार आहे. परिणामी, या प्रस्तावास नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. या ठिकाणावरून पर्यायी रस्त्याची निर्मिती न झाल्यास या विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 

जळगाव : नाइट लॅंडिंगसाठी विमानतळावरील धावपट्टीचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. यामुळे परिसरात नशिराबादच्या शेतकऱ्यांचे साधारण दोन ते अडीच हजार एकर जमीन जात आहे. धावपट्टीमुळे शेतात जाण्याचा मार्ग बंद करण्याचे नियोजन प्राधिकरणाचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना १२ ते १५ किलोमीटरचा फेरा पडणार आहे. परिणामी, या प्रस्तावास नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. या ठिकाणावरून पर्यायी रस्त्याची निर्मिती न झाल्यास या विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 

विमानतळ परिसरातील भागपूर गावाजवळून उमाळ्याला मार्ग जोडतो. शहरासह पाचोरा, यावल, भुसावळ शहरालाही मार्ग जोडला जातो. या परिसरात शेतजमिनी आहेत. विमानतळ प्राधिकरणाने हे क्षेत्र वाढविण्याचे नियोजन केले आहे.

नवीन धावपट्टी झाल्यास नशिराबादकडून उमाळ्याकडे जाणारा मार्ग बंद होणार आहे. परिणामी, नशिराबाद येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीचा रस्ता देखील बंद होणार आहे. शिवाय अन्य जवळचा पर्यायी मार्ग राहणार नसून त्यांना १५ किलोमीटरच्या फेऱ्याने जावे लागणार आहे. 

रस्तानिर्मितीवर सकारात्मक चर्चा

शेतकऱ्यांच्या या विषयासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी विमानतळ प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुनील मंगीरवाल, साईप्रसाद गोरे यांची भेट घेत याविषयावर चर्चा केली. जागेचे नकाशे, सद्यःस्थिती, पर्यायी रस्त्यांची माहिती अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. यासह धावपट्टीच्या खालून रस्त्याच्या निर्मितीची काही उदाहरणेही दाखवून त्यानुसार रस्ता बनविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. या वेळी सकारात्मक चर्चा होऊन खासदार उन्मेष पाटील यांच्या पुढाकारातून प्रश्न सोडविण्याचे या वेळी ठरविण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...