पारगाव मेमाणे येथील विमानतळ सर्व्हेक्षण बंद पाडले 

पारगाव मेमाणे येथील विमानतळ सर्व्हेक्षण बंद पाडले 
पारगाव मेमाणे येथील विमानतळ सर्व्हेक्षण बंद पाडले 

पारगाव मेमाणे, जि. पुणे ः ‘‘आमच्याशी चर्चा केल्याशिवाय, आम्हाला विचारल्याशिवाय आमच्या गावात सर्वेक्षणासाठी पाऊल ठेवाल, तर याद राखा,’’ असा इशारा पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळबाधित सात गावांतील शेतकऱ्यांनी सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना दिला व सर्वेक्षणाचे साहित्य ताब्यात घेऊन काम बंद पाडले. 

नुकतेच विमानतळाच्या नियोजित जागेचे सर्वेक्षण होत असल्याचे समजताच येथील संतप्त शेतकऱ्यांनी संबंधितांकडून लॅपटॉप, ड्रोन कॅमेरा व इतर सर्वेक्षणाचे साहित्य ताब्यात घेत सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना पारगाव मेमाणे येथे थांबवून ठेवले. एकीकडे हरकती घ्या म्हणून सांगणारे सरकार चोरून सर्व्हेचे काम करून शेतकऱ्यांशी फसवणूक करीत आहेत. 

आमच्या गावात परवानगीशिवाय पाऊल टाकाल, तर खबरदार पारगाव एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी या गावांतील संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले. या वेळी जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने, सासवडचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधून सर्वेक्षण कर्मचाऱ्यांची साहित्यासह सुटका केली. 

सर्वेक्षण कर्मचाऱ्यांची सुटका  संतप्त शेतकऱ्यांनी सर्वेक्षण साहित्यासह कर्मचाऱ्यांना बसवून ठेवले होते. परिस्थिती चिघळणार असे लक्षात येताच ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी लॅपटॉप व ड्रोन कॅमेऱ्याच्या मेमरी कार्डमधील दिवसभर केलेले सर्वेक्षण नाहीसे करावे, साहित्यासह कर्मचाऱ्यांना जाऊ द्यावे, असा तोडगा सांगितला. तो संतप्त शेतकऱ्यांना मान्य झाला. मेमरी कार्डमधील झालेले सर्वेक्षण मोबाईलद्वारा नष्ट केल्यानंतरच सर्वेक्षण कर्मचाऱ्यांची सुटका झाली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com