agriculture news in Marathi, Ajit Nawale Says, state level agitation on 1st june, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतकरीप्रश्नी एक जूनला राज्यव्यापी महाघेराव : अजित नवले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 एप्रिल 2018

पुणे : शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळण्यासह शेतकऱ्यांच्या अकरा मागण्यांसाठी एक जून रोजी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांसमोर महाघेराव आंदोलन करण्याची घोषणा अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केली. ‘‘राज्यातील सरकार लबाड आणि विश्वासघातकी आहे; पण शेतकऱ्यांच्या संतापाची आग आता भाजप मंत्र्यांच्या घरांपर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही,’’ असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

पुणे : शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळण्यासह शेतकऱ्यांच्या अकरा मागण्यांसाठी एक जून रोजी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांसमोर महाघेराव आंदोलन करण्याची घोषणा अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केली. ‘‘राज्यातील सरकार लबाड आणि विश्वासघातकी आहे; पण शेतकऱ्यांच्या संतापाची आग आता भाजप मंत्र्यांच्या घरांपर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही,’’ असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

मुंबईत किसान सभेच्या राज्य कार्यकारिणीची दोनदिवसीय बैठक झाली. यात झालेल्या निर्णयाची माहिती डॉ. नवले यांनी पुण्यात दिली. ‘‘नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा लॉँग मार्च काढल्यामुळे आमच्या शेतकरी बांधवांचे व आया-बहिणींचे पाय रक्ताळले होते. सरकारने आम्हाला दीड महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आमचा विश्वासघात झाला असून, काहीही होताना दिसत नाही,’’ असा आरोप डॉ. नवले यांनी केला. 

‘‘शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारने काहीही पावले टाकली नाहीत. राज्य कृषी मूल्य आयोग भक्कम करण्यासाठी उपाय केले नाहीत. शेतकरी कर्जमाफी तसेच वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापनाचे आश्वासनदेखील पाळण्यात आलेले नाही. आश्वासने देणे मात्र त्याचे पालन न करण्याची प्रतिमा भाजप सरकारची तयार झालेली आहे. मात्र, आम्ही आंदोलन थांबविलेले नाही. टप्प्याटप्याने दीर्घकालीन आंदोलन करून आम्ही सरकारला वठणीवर आणू,’’ असे डॉ. नवले म्हणाले. 

किसानसभेने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नाशिकमध्ये महामुक्काम आंदोलन केले, तसेच औरंगाबादला आक्रोश आंदोलन, वाड्यात महामोर्चा, ठाण्यात तिरडी आंदोलन, बुलडाण्यात आसूड मोर्चा तसेच मुंबईत लॉँग मार्च केला. मात्र, सरकार फसवणूक करते आहे. त्यासाठी देशातील दहा कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन पंतप्रधानांना पाठविले जाणार असून, त्यात २० लाख स्वाक्षऱ्या महाराष्ट्रातून पाठविल्या जाणार असल्याचे या वेळी त्यांनी स्पष्ट केले. 

कर्जमुक्ती आणि जमीन आरोग्यासाठी लढू
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि काळ्या आईच्या म्हणजेच शेतजमिनीचे आरोग्य राखण्यासाठी शेतकरी कुटुंबातील प्रत्येक मुलाचा आम्ही पाठिंबा मिळवू. गाव, शहर, सीमेवर लढणारा शेतकरी जवान अशा प्रत्येक ठिकाणी असलेल्या शेतकरीपुत्राचा पाठिंबा आम्ही या लढ्यासाठी घेणार आहोत. शेतकरी जगला तर देश जगेल, याची महती पटलेल्या मानवतावादी कार्यकर्त्यांनादेखील बरोबर घेऊन आम्ही सरकारशी लढा देणार आहोत, असेही डॉ. नवले म्हणाले.

सरकारची नियत साफ नाही 
प्रत्येक वेळी आंदोलन करूनही राज्य सरकार आश्वासनापलीकडे काहीही करीत नाही. कारण, सरकारची नियत साफ नाही. आमचा विश्वासघात करीत राहिला तरी आंदोलने थांबणार नाहीत. दरवेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना चर्चेसाठी पाठविले जाते. महाजन आता सरकारची फायरब्रिगेड बनले आहेत. त्यांनी आम्हाला अजून ओळखलेले नाही. एकदा आग लागल्यावर पुन्हा लागू नये म्हणून महाजन यांनी काळजी घेणे आवश्यक होते. आता भाजप मंत्र्यांच्या घरापर्यंत आमच्या संतापाची आग गेल्याशिवाय राहणार नाही, असे डॉ. नवले यांनी स्पष्ट केले. 
 

 


इतर अॅग्रो विशेष
राज्यातील ५०० कार्यालयांत शेतकरी...मुंबई : शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी,...
ढगाळ हवामानामुळे गारठा कमीचपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव, ढगाळ...
राज्य खत समितीचा ‘रिमोट’ कोणाकडे?पुणे : शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी ‘...
महारेशीम अभियानांतर्गत पाच हजार एकरची...औरंगाबाद: रेशीम विभागाच्यावतीने राबविल्या जात...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सामूहिक...नाशिक : देशातील कृषी व ऋषी संस्कृतीमध्ये काळ्या...
हार्वेस्टर मालकांकडून ऊस उत्पादकांची...सोलापूर ः ऊसतोडणीसाठी शेतकरी हार्वेस्टर मशिनला...
कुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत...अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा...
बदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत...
बोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बागढवळपुरी (जि. नगर) येथील सुखदेव कचरू चितळकर यांनी...
खानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा...जळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर...
हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...
बाजार समित्यांत शेतकऱ्यांना थेट मतदान...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
नीरेपासून साखरनिर्मितीचा रत्नागिरीत...रत्नागिरी ः नारळाच्या झाडातून काढल्या जाणाऱ्या...
परवाना निलंबनातही बिनदिक्कत खतविक्रीपुणे : ‘नियमांची पायमल्ली करून विदेशातून...
शेतकरी प्रश्न सुटण्यासाठी...मुंबई : राज्यात तालुकास्तरावर उद्यापासून...
शनिवारपासून किमान तापमानात घट होण्याची...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
विमाभरपाई प्रक्रिया रिमोट सेन्सिंगशी...पुणे : पीककापणी प्रयोगाच्या आधारावर पंतप्रधान...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...
जैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...