Agriculture news in Marathi, Ajit Pawar confiscates all his deposits | Agrowon

अजित पवारांसमोर सर्वांचेच डिपॉझिट जप्त

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघात अजित पवार यांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचा दीड लाखाहून अधिक मतांनी पराभव करून सातव्यांदा विजय मिळविला आहे. बारामतीत भाजपच्या गोपीचंद पडळकरांसह सर्वच विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघात अजित पवार यांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचा दीड लाखाहून अधिक मतांनी पराभव करून सातव्यांदा विजय मिळविला आहे. बारामतीत भाजपच्या गोपीचंद पडळकरांसह सर्वच विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पवारांच्या बारामतीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपने वंचित बहुजन आघाडीतून आयात केलेल्या गोपीचंद पडाळकर यांना रिंगणात उतरवले. धनगर समाजाचे गोपीचंद पडाळकर अजितदादांपुढे कडवे आव्हान उभे करतील, अशी आशा भाजपला होती. मात्र, ही आशा सपशेल फोल ठरली.  

गुरुवारी मतमोजणीला सुरवात झाल्यापासूनच अजित पवार यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी त्यांनी सातत्याने वाढवत नेली. २०१४ मध्ये गोपीचंद पडळकर भाजपच्या तिकिटावर सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. तर २०१९ लोकसभा निवडणूक वंचितकडून सांगलीमधून लढले होते. 

विधानसभेच्या निवडणुकीसाठी पुन्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट बारामतीमधून उमेदवारी देऊ केली होती. मात्र, ते अजित पवार यांच्यासमोर आव्हान निर्माण करू शकले नाहीत. १९६७ पासून पवार कुटुंबातील व्यक्तीनेच विधानसभेत बारामतीचे प्रतिनिधित्व केले आहे. १९६७ ते १९९० शरद पवार आणि त्यानंतर अजित पवार सातत्याने या मतदारसंघातून निवडून येत आहेत. गेल्या ५० वर्षांत बारामतीमध्ये कुठलाही पक्ष पवार कुटुंबासमोर आव्हान उभा करू शकलेला नाही. दीड लाखाहून अधिक मताधिक्‍य देत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून चालत आलेली परंपरा बारामतीकरांनी कायम ठेवली आहे. 

सातव्यांदा विधानसभेत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदारांचे आभार मानतो, अशा शब्दांत अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्यावरची जबाबदारी आता अधिक वाढलेली असून, बारामतीची राहिलेली विकासकामे वेगाने मार्गी लावण्यास, नवीन विकासाचे प्रकल्प बारामतीत आणण्यासाठी प्रयत्न असेल, असेही अजित पवार म्हणाले.


इतर ताज्या घडामोडी
कळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक  : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...
नुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...
सटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...
काळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती  ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...
मराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...
अकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...
माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे...मानोरा जि. वाशीम ः तालुक्यातील  कारखेडा...
वाळवा तालुक्‍यात द्राक्ष उलाढालीत सात...वाळवा, जि. सांगली : अतिवृष्टीने द्राक्षशेतीचे...
कोल्हापूर जिल्ह्यात बँकांना २५००...कोल्हापूर : ‘‘जिल्ह्यात सर्वच बॅंकांना २ हजार ४३०...
कांदा साठवणूक निर्बंधाचा फेरविचार करानाशिक : गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात...
नांदेड विभागातील १ लाख ८५ हजार टन उसाचे...नांदेड : चार जिल्ह्यांतील ८ कारखान्यांनी यंदाच्या...
चुकीच्या तापमान नोंदीमुळे रत्नागिरीतील...रत्नागिरी  : जिल्ह्यात आंबा, काजू पिकांसाठी...
जागते रहो... कांदाचोरांचा अजून सुळसुळाट...फलटण शहर, जि. सातारा   ः सध्या...
सांगली जिल्ह्यात हळद पिकावर कंदकुज,...सांगली  ः महापूर आणि अतिवृष्टीमुळे कंदकुज...
ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन करू...कोल्हापूर   ः दक्षिण महाराष्ट्रात ओला...
खानदेश, मराठवाडा, विदर्भातील काही...पुणे  ः राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान...
पाच जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य...अकोला  : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य...