भाववाढीचे गाजर दाखवत सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलीय : अजित पवार

भाववाढीचे गाजर दाखवत सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलीय : अजित पवार
भाववाढीचे गाजर दाखवत सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलीय : अजित पवार

नागपूर : जाहीर केलेले भाव दयायचे नाही आणि चुनावी जुमला डोळयासमोर ठेवून भाववाढीचे गाजर दाखवायचे ही शेतकऱ्यांची धादांत फसवणूक आहे अशा शब्दात विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर आज जोरदार हल्लाबोल केला.

शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या सरकारच्या निर्णयावर आज (ता.५) विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना अजितदादांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. 

पवार म्हणाले, "निवडणुकीच्या मतावर डोळा ठेवून सरकारने हे सगळं जाहीर केले आहे. चार वर्षापूर्वी खर्चाच्या दीडपट आधारभूत किंमत देवू असे सांगितले आणि आता सांगत आहेत की आम्ही दिली आहे. परंतु, ही आकडेवारी फसवी आहे. आधारभूत किंमत देण्याचा स्वामीनाथन आयोगाचा जो फॉर्मुला आहे तो यांनी बासनात गुंडाळून ठेवला आहे," शेतकरी विरोधी हे सरकार कशापध्दतीने वागत आहे हे चर्चे दरम्यान त्यांचे कटकारस्थान समोर आणणार असल्याचेही पवार यांनी सांगितले

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही...पीकविम्याची रक्कम नाही... मुळात मंडळ हा गाभा धरुन पीकविम्याची रक्कम मिळायला हवी होती परंतु यांनी तालुका केला आहे. त्यामुळे आमचा शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिला आहे. पीक विम्याच्याबाबतीत पीकविमा कंपन्यांना गब्बर करण्याचे आणि शेतकऱ्याला कंगाल करण्याचे काम भाजप-शिवसेना सरकारने केले असून त्याचा आम्ही निषेध केला असल्याचेही पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com