agriculture news in marathi, ajit pawar demand to declar drought in marathwada, aurangabad, maharashtra | Agrowon

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा ः अजित पवार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

औरंगाबाद  ः मराठवाड्यातील अनेक भागांत ऐन पावसाळ्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पावसाअभावी पिके करपली आहेत. खरिपातील सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

औरंगाबाद  ः मराठवाड्यातील अनेक भागांत ऐन पावसाळ्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पावसाअभावी पिके करपली आहेत. खरिपातील सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बुधवारी (ता. २६) श्री. पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे विभागीय बूथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळावा घेण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राजेश टोपे, सतीश चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, भाऊसाहेब तरमळे उपस्थित होते.

श्री. पवार  म्हणाले, की या सरकारने कर्जमाफीची फक्त घोषणा केली. त्याचा अद्यापही अनेकांना लाभ मिळालेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर वाढत चालले असताना सरकारला त्याचे देणे-घेणे नाही. दुधाचे अनुदान अजून मिळत नाहीये. बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानाचे; तसेच तूर, सोयाबीनचे पैसे मिळालेले नाहीत. राज्याचा महसूल उत्पन्नाचा वेग मंदावला आहे. राफेल प्रकरणात गंभीर आरोप होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीत. सध्याचे सरकार नाकर्ते आणि फेकू आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले, असे प्रश्‍न आता विचारायला हवेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिली तरी सरकार काहीही कामे करीत नाही. मुळात सरकार चालविण्यासाठी पात्रता लागते. नेमकी तीच त्यांच्याकडे नाही, असा टोलाही श्री. पवार यांनी या वेळी लगावला. 

पक्ष संघटनेबाबत ते म्हणाले, की अनेक भागांत पक्षाची ताकद नसली म्हणून कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे सोडू नये. बेरजेचे राजकारण करण्यास शिकावे. लोकांना बदल हवा आहे, तो पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने जनतेला द्यावा.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...