agriculture news in Marathi, Ajit Pawar says, dont relay on false promise of Govt, Maharashtra | Agrowon

सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू नकाः अजित पवार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात नाही. पीक विमा परतावा दिला जात नाही. सर्वच विभागातील नोकर भरती नाही. महिलांचे प्रश्न सुटले नाहीत. गेल्या निवडणुकीत भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे मतदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारच्या फसव्या आश्वासनाला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात नाही. पीक विमा परतावा दिला जात नाही. सर्वच विभागातील नोकर भरती नाही. महिलांचे प्रश्न सुटले नाहीत. गेल्या निवडणुकीत भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे मतदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारच्या फसव्या आश्वासनाला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

गुरुवारी (ता. २२) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जिंतूर येथील जाहीर सभेत श्री. पवार बोलत होत. या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विजय भांबळे, रामराव वडकुते, अमोल मिटकरी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या वेळी डॉ. कोल्हे म्हणाले, की गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याबद्दल शासनाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जनतेने करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा रोज एक गुन्हा घडतो. निवडणूक तोंडावर आल्याने शासन वेगवेगळ्या योजना अमलात आणत आहे.

मात्र अगोदरच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे बेरोजगारी वाढली, शिक्षण, शेती, आरोग्य, पिण्याचे पाणी व इतर ज्वलंत प्रश्न कायम आहेत. या निवडणुकीत शासन कश्मीरमधील ३७० कलमाचा मुद्दा पुढे करून जनतेची दिशाभूल करून मते मागतील, त्यास मतदारांनी भुलू नये, असे यावेळी सांगितले. 

आमदार विजय भांबळे यांनी पाच वर्षात जिंतूर, सेलू तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडला.


इतर अॅग्रो विशेष
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
कमी पावसाच्या प्रदेशात रुजल्या...औरंगाबाद जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दौलताबाद...
शास्त्रीय तंत्राद्वारे वाढवली कांद्याची...अवर्षणग्रस्त येवला तालुक्यातील (जि. नाशिक)...
पडीक जमिनीत फुलवली साडेतीन हजार झाडांची...माहुळंगे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील अनिल...
‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
दीडपट 'एमएसपी' म्हणजे निव्वळ धूळफेक :...पुणे: मोदी सरकारने खरिपासाठी जाहीर केलेल्या किमान...
टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार नागपूर ः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या...
‘निसर्ग’ चक्रीवादळ आज अलिबागजवळ धडकणार पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
मॉन्सून कर्नाटकात आज धडकणारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
बॅंकांसाठी आठ-अ, फेरफार उतारे थेट...पुणे: सातबारा संगणकीकरण उपक्रमाला लॉकडाउनमुळे...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे: अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’...
‘निसर्ग’चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...