agriculture news in marathi, ajit pawar says that many members of bjp ,shivsena alliance are contact with ncp, yavatmal, maharshtra | Agrowon

युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित पवार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि मित्रपक्ष एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. कोणत्या मतदारसंघात कुणाचा उमेदवार निवडून येणार, हे समोर ठेवूनच जागावाटप होणार आहे. निवडणूक जाहीर होऊ द्या, कोण कोणत्या पक्षांकडून निवडणूक लढणार, याचे चित्र राज्यासमोर येईल, असे म्हणत युतीमधील अनेक जण आमच्या संपर्कात असल्याचे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले.

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि मित्रपक्ष एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. कोणत्या मतदारसंघात कुणाचा उमेदवार निवडून येणार, हे समोर ठेवूनच जागावाटप होणार आहे. निवडणूक जाहीर होऊ द्या, कोण कोणत्या पक्षांकडून निवडणूक लढणार, याचे चित्र राज्यासमोर येईल, असे म्हणत युतीमधील अनेक जण आमच्या संपर्कात असल्याचे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले.

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त श्री. पवार यवतमाळ येथे आले होते. बुधवारी (ता. २१) येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, माजी आमदार संदीप बाजोरिया, प्रदेश सरचिटणीस नानाभाऊ गाडबैले आदी या वेळी उपस्थित होते. 

या वेळी अजित पवार म्हणाले, की जिल्ह्यात सोयाबीन व कापूस ही दोन महत्त्वाची पिके घेतली जातात. या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत. याउलट विमा कंपन्या हजारो कोटी रुपये गिळून बसल्या आहेत. या कंपन्यांच्या गैरव्यवहारामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू राहिलेले नाही. पाच वर्षांत शेतकरी, महिला, युवक व तरुणांचे प्रश्‍न सोडविले गेले नाहीत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मोठी आश्‍वासने देण्याचे काम कॅबिनेट बैठकींमार्फत या फसव्या सरकारने सुरू केले आहे. पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे याचा कसलाही लाभ जनतेला होणार नाही. लोकांना आमिष दाखविण्यासाठी जाणीवपूर्वक आश्‍वासनांचा पाऊस पाडला जात असल्याचा आरोपही श्री. पवार यांनी केला.

या वेळी साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतराच्या चर्चेबद्दल विचारले असता, अजित पवार म्हणाले, की त्यांच्या आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघात पूरस्थिती होती. ते त्यांच्या भागात जनतेचे काम करीत आहेत.
 

‘...तर मुख्यमंत्र्यांना यात्रा काढण्याची गरज पडली नसती’
वाशीम  : राज्यात विकासकामे केली असती, तर मुख्यमंत्र्यांना महाजनादेश यात्रा काढण्याची गरजच निर्माण झाली नसती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.  शिवस्वराज्य यात्रा वाशीम जिल्ह्यात दाखल झाली. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पवार बोलत होते. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अमित झनक, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...