Agriculture news in Marathi, From 'Akalpada' it is possible to provide irrigation, non-irrigation needs | Agrowon

‘अक्कलपाडा’तून सिंचन, बिगरसिंचनाची गरज भागविणे शक्‍य
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

देऊर, जि. धुळे ः अक्कलपाडा प्रकल्पात सद्यःस्थितीत ३८१ मीटर तलांकापर्यंत जलसाठा आहे. या जलसाठ्यातून नियोजनानुसार सिंचन व बिगरसिंचनाची गरज भागविता येणे शक्‍य आहे. प्रकल्पातून शेतीसाठी, पिण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रकल्प क्षेत्रातील लघु तलाव भरण्याचेही काम सुरू आहे. प्रकल्पातील जलसाठ्याबाबत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन धुळे मध्यम प्रकल्प विभागाने केले आहे.

देऊर, जि. धुळे ः अक्कलपाडा प्रकल्पात सद्यःस्थितीत ३८१ मीटर तलांकापर्यंत जलसाठा आहे. या जलसाठ्यातून नियोजनानुसार सिंचन व बिगरसिंचनाची गरज भागविता येणे शक्‍य आहे. प्रकल्पातून शेतीसाठी, पिण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रकल्प क्षेत्रातील लघु तलाव भरण्याचेही काम सुरू आहे. प्रकल्पातील जलसाठ्याबाबत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन धुळे मध्यम प्रकल्प विभागाने केले आहे.

अक्कलपाडा प्रकल्पात सद्यःस्थितीत ३८१ मीटर तलांकापर्यंत अर्थात ६४.२६ दलघमी (२२६९ दलघफू) पाणीसाठा निर्माण करण्यात येत आहे. धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळांतर्गत धुळे मध्यम प्रकल्प विभागाच्या कार्यालयाकडून येणाऱ्या वर्षात प्रकल्प अहवालातील तरतुदीनुसार सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी आवश्‍यक असलेला जलसाठा निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात आले होते. आजपर्यंत दोन्ही कालव्यांद्वारे २४ तास पाणी सुरू आहे. 

धुळे शहरासाठी जलसाठा सुरू
प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे हरणमाळ तलावात जलसाठा करण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत जास्तीत जास्त जलसाठा निर्माण करण्यासाठी कालव्याची साफसफाई पावसाळ्यापूर्वीच करण्यात आली. या कालवा स्वच्छतेच्या कामासाठी नवीन निविदा काढण्यात आली नाही व कुठल्याही प्रकारचा खर्च करण्यात आलेला नाही. धुळे महापालिका पिण्यासाठी एक वर्षाकरिता ३६० दलघफू पाणी आरक्षित करते. सध्या नकाणे तलावात २३८ दलघफू, हरणमाळ तलावात ७२ दलघफू असा एकूण ३१० दलघफू पाणीसाठा निर्माण झाला आहे. अद्यापही कालव्याद्वारे विसर्ग सुरूच आहे. यातून धुळे शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

शेती सिंचनासाठीही तरतूद
अक्कलपाडा प्रकल्पातून शेती सिंचनासाठी तीन हंगामांकरिता ४४.३५ दलघमी (१५६६ दलघफू) पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. या वर्षी आतापर्यंत प्रकल्पातून खरिपासाठी२२९ दलघफू पाणी सोडण्यात आले असून, लाभक्षेत्रातील निमडाळे पाझर तलाव, अमराई नदीवरील तीन साठवण बंधारे, नवलाणे पाझर तलाव, सोनूबाई धरण, डामा धरण, कोकर्डी पाझर तलाव, गोताणे तलाव पूर्णतः भरण्यात आले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...
तुरीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनमहाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक असलेल्या तुरीची...