Agriculture news in marathi Of Akluj Municipality Malshirasala fast for demand | Page 2 ||| Agrowon

अकलूज नगरपालिकेच्या मागणीसाठी माळशिरसला उपोषण

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

अकलूज येथे नगरपालिका व नातेपुते येथे नगरपंचायत करण्याच्या मागणीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी माळशिरस तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. 

सोलापूर : अकलूज येथे नगरपालिका व नातेपुते येथे नगरपंचायत करण्याच्या मागणीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. १८) अकलूज, नातेपुते व माळेवाडी येथील नागरिकांनी माळशिरस तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. 

जिल्ह्यातील या दोन्ही ग्रामपंचायतीचे नगरपालिका आणि नगरपंचायतीत रुपांतर करण्यासाठी राज्य सरकार जाणीवपूर्वक खोडा घालत असल्याचा आरोप या वेळी आमदार मोहिते पाटील यांनी केला. तसेच राज्य सरकारने ठोस भूमिका जाहीर न केल्यास अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. सर्वसामान्य जनतेला विकासापासून वंचित ठेवण्याचे राजकारण या सरकारने न थांबवल्यास विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह आवाज उठवणार असल्याचे त्यांनी बजावले. भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य शीतलदेवी मोहिते पाटील, अकलूजचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी याप्रश्नी कशी अडवणूक केली जात आहे,

याबाबतची माहिती दिली. तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, बाजार समितीचे उपाध्यक्ष मामा पांढरे, अॅड. भानुदास राऊत, सभापती शोभा साठे, उपसभापती प्रताप पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूजच्या सरपंच पायल मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...