अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के शेतकरी दूरच

अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, पेरण्यांनी वेग घेतलेला आहे. असे असतानाही जिल्ह्यातील सुमारे ५२ टक्के शेतकरी अद्यापही पीक कर्जापासून दूर असल्याचे समोर आले. या हंगामात १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचा ११४० कोटींचा लक्ष्यांक असताना आत्तापर्यंत ६७१९४ शेतकऱ्यांना ५४६ कोटींचे पीककर्ज मिळाले. पीक कर्ज मिळालेल्यांचे प्रमाण सरासरी ४८ टक्के एवढे आहे.
In Akola district, 52% farmers are far from crop loans
In Akola district, 52% farmers are far from crop loans

अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, पेरण्यांनी वेग घेतलेला आहे. असे असतानाही जिल्ह्यातील सुमारे ५२ टक्के शेतकरी अद्यापही पीक कर्जापासून दूर असल्याचे समोर आले. या हंगामात १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचा ११४० कोटींचा लक्ष्यांक असताना आत्तापर्यंत ६७१९४ शेतकऱ्यांना ५४६ कोटींचे पीककर्ज मिळाले. पीक कर्ज मिळालेल्यांचे प्रमाण सरासरी ४८ टक्के एवढे आहे.

हंगामात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांजवळ पैसा नाही, अशी ओरड सुरू होती. लोकप्रतिनिधी वारंवार बँक अधिकाऱ्यांच्या भेटी घेत पीक कर्ज वाटपाची गती वाढविण्याबाबत निर्देश देत आहेत. याचा परिणाम जून महिन्यात बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती थोडीफार वाढविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच जिल्ह्याचे पीक कर्ज वाटप ४८ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. जिल्ह्यात या हंगामात सुमारे पावणेपाच लाख हेक्टरचे नियोजन झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज हवे होते. प्रशासनाने जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार शेतकऱ्यांना ५०० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी ११४० कोटींचा लक्ष्यांक घेतलेला आहे. यापैकी ५० टक्केही रक्कम वितरित झालेली नाही.

जिल्हा बँक आघाडीवर अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीप्रमाणे याहीवेळी पीक कर्ज वाटपात आघाडी घेतली. जिल्ह्यात आत्तापर्यंत जे पीक कर्ज वाटप झाले त्यात या बँकेने सर्वाधिक ४० हजार ७७३ शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले. या शेतकऱ्यांना बँकेने ३०२ कोटी ३६ लाख रुपये वाटप केले आहे. सेवा सहकारी सोसायटींच्या माध्यमातून बँकेने या हंगामात पीक कर्ज वाटपात मोठी आघाडी घेतली. कोरोना, कर्जमाफीची प्रक्रिया यामुळे यंदा वेळेवेर कर्जपुरवठा सुरू होऊ शकला नव्हता, तरीही या बँकेने सहकारी सोसायटींच्या जाळ्याचा योग्य वापर करीत कर्ज वाटप केले.

इतर बँकांची जेमतेम कामगिरी जिल्ह्यात ग्रामीण बँक; तसेच व्यावसायिक बँकांनी पीक कर्ज वाटपात मात्र हात आखडता घेतलेला आहे. ग्रामीण बँकेने आत्तापर्यंत ७८११ शेतकऱ्यांना ७१ कोटी ५५ लाख रुपये पीक कर्ज दिले आहे; तर व्यावसायिक बँकांनी १८ हजार ६१० शेतकऱ्यांना १७२ कोटी २८ लाख रुपये वाटप केले. जिल्ह्यांचा लक्षांक अद्याप ५० टक्के पूर्ण झालेला नाही. त्यातच कर्जमाफी न मिळालेल्यांची संख्याही अधिक असल्याने या शेतकऱ्यांना शासनाचे निर्देश असूनही बँकांनी पीक कर्जासाठी उभे केलेले नाही. जिल्ह्यात ७१ हजार शेतकऱ्यांना ४४५ कोटींचा कर्जमुक्तीचा लाभ आजवर मिळाला. त्यामुळे कर्जमुक्त झालेल्यापैंकी अंदाजे ५४ हजार नवीन सभासद पीक कर्जास पात्र ठरलेले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com