कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
अकोला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. संतोषकुमार कोरपे
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे डॉ. संतोषकुमार कोरपे यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी वाशीम जिल्ह्याच्या श्रीधरराव कानकिरड यांना संधी मिळाली आहे.
अकोला : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे डॉ. संतोषकुमार कोरपे यांची निवड झाली तर उपाध्यक्षपद वाशीम जिल्ह्याच्या वाट्याला गेले असून, कारंजा तालुक्यातून विजयी झालेले श्रीधरराव कानकिरड यांना संधी मिळाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत डॉ. कोरपे गटाचे सर्व २१ संचालक विजयी झाले आहेत. या निवडणुकीत १२ संचालक बिनविरोध निवडले गेले होते तर ९ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान झाले होते. २१ फेब्रुवारीला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आले. या प्रक्रियेनंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीकडे अकोला, वाशीम जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते.
त्यानुसार बुधवारी (ता. तीन) या निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. डी. कहाळेकर यांच्या उपस्थितीत सभा झाली. यात अध्यक्षपदासाठी डॉ. कोरपे आणि उपाध्यक्षपदासाठी कानकिरड यांचे नाव सूचविण्यात आले या नावांवर बिनविरोध शिक्कामोर्तब झाले. या वेळी बँकेचे संचालक, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
- 1 of 1098
- ››