agriculture news in marathi, Akola district bank inter in mobile bank, Maharashtra | Agrowon

अकोला जिल्हा बँकेचे आता मोबाईल बँकिंग क्षेत्रात पाऊल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 जुलै 2018

अकोला ः अकोला व वाशीम जिल्ह्यांत शेतकऱ्यांसह ग्राहकांसाठी सक्रिय कार्यरत असलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काळाची पावले अोळखत मोबाईल बँकिंग क्षेत्रात पाऊल टाकले अाहे. ‘अकोला डीसीसी -एम पे’ नावाचे मोबाईल ॲप बँकेतर्फे सुरू केले जात असून येत्या रविवारी (ता.२९) याचा लोकार्पण सोहळा अायोजित करण्यात अाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी दिली. 

अकोला ः अकोला व वाशीम जिल्ह्यांत शेतकऱ्यांसह ग्राहकांसाठी सक्रिय कार्यरत असलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काळाची पावले अोळखत मोबाईल बँकिंग क्षेत्रात पाऊल टाकले अाहे. ‘अकोला डीसीसी -एम पे’ नावाचे मोबाईल ॲप बँकेतर्फे सुरू केले जात असून येत्या रविवारी (ता.२९) याचा लोकार्पण सोहळा अायोजित करण्यात अाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी दिली. 

या सोहळ्याची माहिती देण्यासाठी बँकेच्या मुख्यालयात नुकतीच पत्रकार परिषद झाली. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष वामनराव देशमुख, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य उपस्थित होते. या सोहळ्याला प्रसिद्ध वक्त्या श्रीमती शेरॉन प्रभाकर, ‘अाधार’चे संचालक सुमनेष जोशी, जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय, लक्ष्मीनारायण मिश्रा, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले उपस्थित राहतील. डॉ. संतोषकुमार कोरपे हे अध्यक्षस्थानी असतील. 

अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक ११० वर्षांपासून अकोला व वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी असल्याचे सांगत डॉ. कोरपे म्हणाले, की बँकेने १०० टक्के पीक कर्जवाटप केसीसी कार्डद्वारे करून सहकारी बँकांमध्ये कार्डद्वारे कर्जवाटपाचा उच्चांक गाठला अाहे. ग्रामीण भागातील युवक अापल्या पायावर उभे राहले पाहिजे यासाठी विविध शेतीपूरक व्यवसायाकरिता कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यावर्षी बँकेने अातापर्यंत ३७ हजार सभासद शेतकऱ्यांना २६४ कोटींचे पीक कर्जवाटप केले अाहे.

बँक आता शेतीक्षेत्रासोबतच व्यावसायिक बनण्याचा प्रयत्न करीत अाहे. शेतकरी व ग्रामीण युवकांसह नोकरदार, व्यापारी, उद्योजक यांच्याकरीत विविध प्रकारच्या कर्ज योजना बँक राबवित अाहे. गेल्या काही वर्षांत ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी विविध उपाय योजण्यात येत अाहेत. अाता मोबाईल बँकिंकमुळे ग्राहकांना सातही दिवस अाणि २४ तास व्यवहार करण्याची मुभा मिळणार अाहे, असेही डाॅ. कोरपे म्हणाले.    

इतर अॅग्रो विशेष
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...
आबासाहेब झाले ग्लॅडिओलस पिकातील मास्टरअभ्यासू, तंत्रशुद्ध व प्रयोगशील शेतीचे उत्तम...
दूध पावडर निर्यात अनुदान नाकारल्याने...पुणे : निर्यात केलेल्या दूध पावडरला प्रोत्साहन...
उर्वरित विमा रक्‍कम द्या देण्याचे...जामखेड, जि. जालना  : विमासंरक्षित रकमेनुसार...
सरपंच, उपसरपंचांचे  मानधन आता ऑनलाइन पुणे : राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंचांचे मानधन...
राजापुरात भातावर लष्करी अळीरत्नागिरी : राजापूर तालुक्यात परिपक्व झालेल्या...
मॉन्सून आज घेणार महाराष्ट्राचा निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आचारसंहितेची...सोलापूर : सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह २५...
‘ऑक्टोबर हीट’ने महाराष्ट्र तापला पुणे : पावसाच्या उघडिपीनंतर राज्यात ‘ऑक्टोबर हीट’...
फळबागा, मिश्रपिके, सिंचनासह शेती केली...मौजे रेवगाव (ता. जि. जालना) येथील अनिल व विनोद या...