agriculture news in marathi Akola District crop damage Paisewari is above 53 paise | Page 4 ||| Agrowon

अकोला जिल्ह्याची पैसेवारी ५३ पैसे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 नोव्हेंबर 2021

अकोला जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र याचा शासनाच्या पैसेवारीही काहीही परिणाम दिसून आलेला नाही. प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ५३ पैसे जाहीर केली आहे.

अकोला : जिल्ह्यात या वर्षी झालेला अनेकदा ढगफुटीसदृश पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र याचा शासनाच्या पैसेवारीही काहीही परिणाम दिसून आलेला नाही. प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ५३ पैसे जाहीर केली आहे. ९९० गावांची ही पैसेवारी काढण्यात आली आहे. पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील पीकपरिस्थिती उत्तम असल्याची एकप्रकारे मोहर लागली आहे. 

दरम्यान, अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करीत असतो. या पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशांच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे. हीच परंपरा मागील अनेक वर्षांपासून रूढ झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागते. 

दर वर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर होते. ऑक्टोबरमध्ये सुधारित नजरअंदाज तर डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. या पैसेवारीनंतर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते. ५० टक्क्यांच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीकपरिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांच्यावर निघाल्यास पीकपरिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे समीकरण आहे. जिल्ह्यात ९९० गावे खरीप पिकांची लागवडी योग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या या गावांमधील सुधारित नजरअंदाज पैसेवारी सरासरी ५३ पैसे असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

...असे झाले होते नुकसान
जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पावसामुळे दीड लाख हेक्टरर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे ९ हजार ३८.०७ हेक्टर वरील शेत जमीन खरडून गेली होती. हे नुकसान २१ ते २४ जुलै आणि ६ ते ९ सप्टेंबर या दोन टप्प्यांतील अतिवृष्टीमुळे झाले आहे. याव्यतिरिक्त ऑगस्ट महिन्यात सुद्धा सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. असे असल्यानंतर सुद्धा आधी जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक, तर आता सुधारित नजरअंदाज पैसेवारीसुद्धा ५३ पैसे जाहीर करण्यात आल्यामुळे अतिवृष्टीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांवर अस्मानीसह सुलतानी संकटसुद्धा असल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय खरीप पिकांची पैसेवारी

  • अकोला  :  ५२
  • अकोट  :  ५३
  • तेल्हारा  :  ५२
  • बाळापूर  :  ५२
  • पातूर  :  ५४
  • मूर्तिजापूर  :  ५३
  • बार्शीटाकळी  :  ५४

इतर ताज्या घडामोडी
आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी...आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा...
नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नांदेड : जिल्ह्यात २९ डिसेंबर रोजी झालेल्या...
शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...यवतमाळ : शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...
अनुकूल स्थिती होताच शर्यतींना परवानगी ः...पुणे ः ‘‘राज्यात कोविडमुळे काही भागांमध्ये...
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...
पशुरोगांच्या निदान, उपचारात नव...अकोला ः कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍...
कापडावर वाढीव जिएसटीला तुर्तास स्थगिती...कापडावरचा जीएसटी (GST) वाढवण्याचा निर्णय...
सोयाबीन बाजार सुधारलागेल्या आठवड्यात सरकारने तीन महत्त्वाचे निर्णय...
मी विजबील माफीची घोषणा केलीच नव्हती :...मुंबई : आज विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (...