अकोल्यातील वान वगळता इतर प्रकल्पांत जेमतेम साठा

अकोल्यातील वान वगळता इतर प्रकल्पांत जेमतेम साठा
अकोल्यातील वान वगळता इतर प्रकल्पांत जेमतेम साठा

अकोला ः राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू असला तरी यंदा वऱ्हाडातील अकोला, वाशीम जिल्ह्यांवर पावसाची अवकृपा झालेली आहे. अकोला जिल्ह्यात सरासरीपेक्षा ८ टक्के तर वाशीम जिल्ह्यात सुमारे २२ टक्के कमी पाऊस झालेला आहे. केवळ बुलडाणा जिल्हाच आतापर्यंत समाधानकारक गटात आहे. जोरदार पावसाअभावी अकोला, वाशीम जिल्ह्यातील प्रकल्प ऑगस्ट महिना सुरू होऊनही पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. या जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्प रितेच आहेत.

यावर्षी जूनच्या शेवटच्या टप्प्यात या भागात मॉन्सूनचे आगमन झाले. काही दिवस दडी मारल्यानंतर जुलैत पाऊस आला. त्यामुळे पेरण्यांनी वेग घेतला. पुन्हा पावसाने १५ दिवसांपेक्षा अधिक दडी मारली. आता २६ जुलैपासून पाऊस सक्रीय झाला. परंतु पडणाऱ्या पावसात जोर नव्हता. रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. पावसात जोर नसल्याने अकोला, वाशीममध्ये नदी-नाल्यांना पुरेशे पाणी वाहले नाही. यामुळे प्रकल्प भरू शकलेले नाहीत.

अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पाची क्षमता ३४७.७७ मीटर असून सध्या यात केवळ ३.०४२ मीटर म्हणजेच ३.५२ टक्के एवढाच साठा आहे. या धरणक्षेत्रात केवळ २०८.६ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.  मोर्णा मध्यम प्रकल्पाची क्षमता ३६६.९७ मीटर असून या प्रकल्पात सध्या ५.४१ मीटर साठा असून त्याची टक्केवारी १३.०४ एवढी आहे.

अकोला जिल्ह्यातील वान या एकमेव प्रकल्पात ५०.०१ टक्के साठा झालेला आहे. हा प्रकल्प सातपुड्यात असून त्याच्या परिसरात ६५० मिलिमीटर पाऊस झालेला आहे. प्रकल्पात सातपुडा पर्वतातून वाहणाऱ्या नदी-नाल्यांचे पाणी यात गोळा होते. वानची क्षमता ४१२ मीटर असून सध्या यात ४०१.१३ मीटर साठा झाला आहे. निर्गुणा प्रकल्पात ०.८१ मीटर साठा आहे. उमा, दगडपारवा, घुंगशी यामध्ये सध्या उपयुक्तसाठा झालेला नाही.

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्प वधारले वऱ्हाडात एकमेव बुलडाणा जिल्हा सध्या पावसाच्या बाबतीत आघाडीवर आहे. जिल्ह्यात सरासरी ६६७.८ मिलिमीटरच्या तुलनेत ६०.४७ टक्के म्हणजे ४०३.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे नळगंगा प्रकल्पात ८.६९ दलघमी साठा आहे. याशिवाय पेनटाकळी २२.५१, पलढग ७.५१, ज्ञानगंगा १७.११, मस ८.५०, मन १२.३३, तोरणा ३.२८, उतावळी ५.६१ इतका साठ झालेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com