अकोला जिल्ह्यातील २६ मंडलांत अतिवृष्टी

अकोला ः गेल्या २४ तासांत वऱ्हाडात प्रामुख्याने अकोला, वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्‍य पाऊस झाल्याने दाणादाण उडाली.
Akola district Heavy rain in 26 circles
Akola district Heavy rain in 26 circles

अकोला ः गेल्या २४ तासांत वऱ्हाडात प्रामुख्याने अकोला, वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्‍य पाऊस झाल्याने दाणादाण उडाली. प्रामुख्याने अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात विक्रमी १६८ मि.मी पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. मोर्णा तसेच इतर उपनद्यांना पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचेही प्रकार घडले. २६ मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

बुधवारी (ता.२१) सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. रात्रभर जोराचा पाऊस पडला. या पावसाने यंदाच्या हंगामात आजवरचा उच्चांक गाठला. अवघ्या काही तासात बार्शीटाकळी तालुक्यात १६८, तर अकोल्यात ११६ मि.मी पाऊस झाला. मोर्णा नदीला प्रचंड पूर आला. या पुराचे पाणी अकोला महानगरातील सखल भागात शिरले. बार्शीटाकळीत १६८ मि.मी पाऊस होण्याची ही गेल्या काही वर्षातील पहिलीच घटना ठरली. या पावसाने तालुक्यात सर्वच नद्या, नाले ओसंडून वाहू लागल्या. 

महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात वेगाने साठा वाढत आहे. दगडपारवा प्रकल्पात ८०.९४ टक्के साठा झाल्याने एक वक्रद्वार गुरुवारी सकाळी ११.३० वाजता उघडण्यात आले. पूर्णा बॅरेज-२ (नेरधामना), घुंगशी बॅरेजचे सर्व दरवाजे वर उचलण्यात आले. काटेपूर्णा प्रकल्पात ४४.८३ दलघमी साठा झाला. पुरात अनेक जनावरे वाहून गेल्याचे वृत्त आहे. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत तातडीने आढावा घेतला जात आहे. 

सांगवी खुर्दमध्ये शिरले पाणी 

अकोला तालुक्यातील मोर्णा नदीकाठावरील सांगवी खुर्द गावात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. पुराच्या पाण्यात उमेश श्रीकृष्ण मोरे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर वाहून गेल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

रतनवाडी प्रकल्प ‘ओव्हर-फ्लो’

वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील रतनवाडी व फुलउमरी हे प्रकल्प भरले आहेत. त्यांच्या  सांडव्यातून रात्रीपासून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. शेतांमध्ये पाणी जाऊन अतोनात नुकसान झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com