अकोला जिल्ह्यात ३.८४ लाख हेक्टरला अतिवृष्टीचा तडाखा

अकोला जिल्ह्यात ३.८४ लाख हेक्टरला अतिवृष्टीचा तडाखा
अकोला जिल्ह्यात ३.८४ लाख हेक्टरला अतिवृष्टीचा तडाखा

अकोला  ः गेल्या महिन्यात झालेल्या सततचा पाऊस व काही भागातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे दोन लाख ९८ हजार शेतकऱ्यांना फटका बसला असून, पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात या वर्षी खरिपात पेरणी झालेले ३ लाख ८४ हजार ५१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. नुकसानीचा संयुक्त अहवाल लवकरच शासनाकडे पाठविला जाणार आहे.  मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन, मका, ज्वारी, कापूस ही पिके जागेवर खराब झाली. प्रामुख्याने सोयाबीन, ज्वारीला कोंब फुटले होते. कापसाच्या बोंड्या काळ्या पडल्या. वेचणीला आलेला कापूस ओला होत, त्यातूनही काही भागांत कोंब निघाले होते. जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात नुकसानीचे प्रमाण सारखेच होते. यामुळे शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजनच विस्कळित झाले. या संपूर्ण नुकसानाचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार महसूल, कृषी व जिल्हा परिषद यंत्रणेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहेत. खरिपात अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली आहे. आता पीकच हातातून गेल्याने वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, नवीन हंगामासाठी पैसा कसा उभा राहील, असे पेच आहेत.  जिल्ह्यात अकोला तालुक्यात ८२१०३ हेक्टर, अकोटमध्ये ४५५६०, बार्शीटाकळी ४५५६०, तेल्हारा ४९४०६, बाळापूरमध्ये ५५५०८, पातूर ४२२४९ आणि मूर्तिजापूरमध्ये ५५८०९ हेक्टर, असे तीन लाख ८४ हजार हेक्टरवरील पिके बाधित झालेले आहेत. २.९४ हजार शेतकऱ्यांचे यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. सर्व्हेक्षणाचा शिवधनुष्य यंत्रणांनी पेलला? पीक नुकसानीचे सर्व्हेक्षण करताना विविध प्रपत्रात माहिती भरणे गरजेचे होते. सोबतच प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा करणे अपेक्षित होते. शिवाय विमा कंपन्यांचे कर्मचारी पुरेसे नसल्याने ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला त्यांना मदत मिळावी यासाठीसुद्धा स्थळ पंचनामा करावा लागला. संयुक्त समितीने पंचनामा करतानाच पीक नुकसान स्थळावरील छायाचित्र (जिओ टॅगिंग) आवश्यक होते. यासर्व बाबींची परिपूर्तता करीत हा सर्व्हे झाला आहे. याचा अंतिम अहवाल आता जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविला जाईल. त्यानंतरच पुढील मदतीचे धोरण ठरेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com