विदेशी भाजीपाल्याचा लागला शेतकऱ्याला लळा

Akola in farmers sowing foreign vegetable
Akola in farmers sowing foreign vegetable

बुलडाणा  ः विविध प्रकारच्या विदेशी भाज्या आपल्या शेतात पिकवून त्याची स्वतः हात विक्री करीत बाजारपेठ विकसित करणारे विष्णू गडाख यांचा हा प्रयोग आता राज्यभरात चर्चेचा झाला आहे. त्यांच्या या प्रयोगाची व भाजीपाल्याची माहिती घेण्यासाठी विविध जिल्ह्यांतील शेतकरी भेटी देत आहेत. 

गेल्या वर्षी ‘ॲग्रोवन’मध्ये त्यांची यशोगाथा प्रसिद्ध झाल्यानंतर भेटीचा हा ओढा अधिकच वाढला आहे. बुलडाणासारख्या छोट्या शहरात गडाख यांनी विदेशी भाज्यांची गोडी ग्राहकांत रुजविण्याचे काम चालविले आहे. बुलडाणा शहराला लागूनच असलेल्या येळगाव येथील धरणाला लागून गडाख यांची शेती आहे. ते काही गुंठ्यात या भाज्यांची लागवड करतात. हिवाळा सुरू होताच या भाज्या बाजारात विक्रीला उपलब्ध होतात. सध्या बुलडाण्यात गडाख यांचे हे भाजीपाल्याचे दुकान आकर्षण ठरत आहे. 

इंटरनेटचा शेतीसाठी उपयोग विदेशी भाज्यांचे बियाणे ते आॅनलाइन पद्धतीने बियाणे मागवतात. त्याची रोपे तयार करून पेरणी करतात. या भाजीपाला खत, कीडनाशक फवारणी, पाणी व्यवस्थापनाची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून काढली. आता त्यात अनुभव मिळवल्याने तितक्या अडचणी येत नसल्याचे ते म्हणाले. सातत्याने यू-ट्यूबवरील व्हिडिओ व इतर सोशल मीडियाचा माहितीसाठी वापर ते करतात.  विष्णू गडाख यांची विदेशी भाजीपाल्याची लागवड - पहा video

हा भाजीपाला पिकवतात गडाख लँटुस, ब्रोकोली, बेसील, पोकचोई, ग्रीन झुकीणी, यलो झुकीणी, रेड रँडीश, रेड लोलोरोसा, स्वीस चाँर्ड मशरुम, चायनीज कॅबेज अशा विविध प्रकारच्या २५ देशी व विदेशी भाज्यांची शेती ते करतात. या भाजीपाल्याची ओळख ग्राहकांना करून देण्यासाठी त्यांनी प्रत्येक भाजीचे गुणधर्म असलेली पत्रके छापली. त्याद्वारे ही माहिती ग्राहकांना देतात व त्यातून ग्राहकाची सवय वाढवतात. हा फंडा फायदेशीर ठरला असून आता बुलडाण्यात विविध विदेशी भाज्यांची हातविक्री करणारे ते एकमेव बनलेले आहेत. यातून दररोज मोठी उलाढाल होत असते. सध्या या भाज्यांची विक्री सुरू झाली आहे. आता ग्राहक विष्णू यांच्या शेतातील अशा भाज्यांची प्रतीक्षा करू लागले आहेत.

शेतकरी देताहेत भेटी  गडाख यांची ही प्रयोगशील शेती पाहण्यासाठी कृषी विभागामार्फत निघणाऱ्या विविध सहली गडाख यांच्या शेतात येत असतात. काही शेतकरी तर वैयक्तिक भेटीसाठीही येत आहेत. आजवर शेकडो शेतकऱ्यांनी गडाख यांची ही विदेशी भाजीपाल्याची शेती पाहली आहे. ‘ॲग्रोवन’मध्ये यशोगाथा आल्यानंतर यात मोठी भर पडली. नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी विभागाच्या सहलीने गडाख यांच्या शेतात भेट देऊन माहिती घेतली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com