Agriculture news in marathi; Akola is the first in the state to digitize seven times: Guardian Minister Patil | Agrowon

सातबारा डिजिटल करण्यात अकोला राज्यात प्रथम ः पालकमंत्री पाटील
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

अकोला ः सातबारा डिजिटल करण्याच्या प्रकल्पात अकोला जिल्ह्यात ९७.५५ टक्के काम पूर्ण झाले असून, अकोला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच डिजिटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्ह्याचे अभिलेख स्कॅनिंगचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरणात अकोला जिल्हा राज्यात अव्वल असून, जिल्ह्यात २ लाख एक हजार १२७ लाभार्थ्यांना कार्ड वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. 

अकोला ः सातबारा डिजिटल करण्याच्या प्रकल्पात अकोला जिल्ह्यात ९७.५५ टक्के काम पूर्ण झाले असून, अकोला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच डिजिटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्ह्याचे अभिलेख स्कॅनिंगचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरणात अकोला जिल्हा राज्यात अव्वल असून, जिल्ह्यात २ लाख एक हजार १२७ लाभार्थ्यांना कार्ड वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा ७२ वा वर्धापन दिन सोहळा झाला. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह इतर उपस्थित होते. या वेळी डॉ. पाटील म्हणाले, अकोला जिल्ह्यात जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यात ४९८ गावांची निवड करून आत्तापर्यंत ३७६ लाभार्थ्यांना १ कोटी ४ लाख रुपयांचा लाभ थेट बॅंक खात्यांत देण्यात आला आहे.

पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गत या वर्षी खरीप हंगामात १ लाख ९४ हजार ८४६ शेतकऱ्यांनी ९० हजार १९२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. मागील वर्षीच्या ३८ हजार ७७२ विमाधारकांना पीकविमा कंपनीकडून नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत जमा करण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत स्वयंरोजगारासाठी २ कोटी ७१ लाख १६ हजार ५५७ रुपये इतके कर्जवाटप झाले आहे. 

दरम्यान, जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अंतर्गत जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ६१३ गावांत जलसंधारणाची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात ४७८ गावे जल परिपूर्ण झाली आहेत. या कामांमुळे  ७२ हजार ४४६ हेक्टर संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानात जिल्ह्यात आत्तापर्यंत ५२ लाख ६४ हजार वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली आहे. तसेच ‘एक विद्यार्थी एक झाड’ या अकोला पॅटर्नअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड केली आहे.

मत्स्यगंधा वाहनाचे वाटप 
मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकरी गटांना जिल्हा वार्षिक योजनेतून देण्यात आलेल्या मत्स्यगंधा या वाहनाचे वितरण या वेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वाहनांतून विविध मत्स्यपदार्थ बनवून हे मत्स्य व्यावसायिक  विक्री करू शकणार आहेत. त्यासाठी सुसज्ज अशी ही वाहने लाभार्थी गटांना वितरित करण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...