‘कॉपशॉप’ उभारणीसाठी पुढाकार घ्या

सहकारी गृहनिर्माण संस्थांनी रास्त दरात शेतीमालासाठी सहकार विकास महामंडळाच्या ‘सहकार दुकान’ (कॉपशॉप) उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
‘कॉपशॉप’ उभारणीसाठी पुढाकार घ्या Take the initiative to set up a 'copshop'
‘कॉपशॉप’ उभारणीसाठी पुढाकार घ्या Take the initiative to set up a 'copshop'

पुणे : सहकारी गृहनिर्माण संस्थांनी रास्त दरात शेतीमालासाठी सहकार विकास महामंडळाच्या ‘सहकार दुकान’ (कॉपशॉप) उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.  महामंडळाच्या वतीने साखर संकुल येथे उभारण्यात आलेल्या ‘कॉपशॉपला’ पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.  सहकार विकास महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी साखर संकुल सह विविध भागात पाच कॉपशॉप उभारण्यात आली आहेत. भेटी दरम्यान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी माहिती दिली. आकरे म्हणाले, ‘‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजने अंतर्गत राज्यातील सहकारी संस्था, शेतकरी गट, उत्पादक कंपन्या, महिला बचत गट यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावा, यासाठी पाच कॉपशॉप उभारण्यात आली आहेत. या प्रत्येक ‘कॉपशॉप’मध्ये १४ महिला बचत गट, १२ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ७ सहकारी संस्थांची सुमारे १६६ उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. याद्वारे प्रत्येक केंद्राची रोजची उलाढाल सुमारे ५ हजार रुपयांची होत आहे. टप्प्याटप्पात या योजनेचा राज्यात विस्तार करण्याचे नियोजन आहे.’’ या वेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, विशेष अधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com