हरभरा डाळीच्या दरात वाढ 

कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ग्राहकांची बाजारातील गर्दी कमी झालेली आहे. त्यामुळे बाजारातील ग्राहक कमी झाल्याने हरभरा डाळ, शेंगदाणे तेल वगळता सर्वच धान्याचे भाव स्थिरावलेले आहेत.
हरभरा डाळीच्या  दरात वाढ Gram of pulses Increase in rates
हरभरा डाळीच्या  दरात वाढ Gram of pulses Increase in rates

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ग्राहकांची बाजारातील गर्दी कमी झालेली आहे. त्यामुळे बाजारातील ग्राहक कमी झाल्याने हरभरा डाळ, शेंगदाणे तेल वगळता सर्वच धान्याचे भाव स्थिरावलेले आहेत. या महिन्याच्या अखेरीस येणारी होळी आणि एप्रिल महिन्यात येणाऱ्या गुढीपाडव्यामुळे हरभरा डाळीची मागणी वाढल्याने भाववाढ झाली आहे.

भाज्या स्वस्त असल्याने तूर डाळीची मागणी कमी असल्याने भाव स्थिरावलेले आहेत. सोयाबीन तेलाचे भाव वाढल्याने शेंगदाणे तेलाचे भावही वधारलेले आहेत.  महिन्याचा अखेरचा आठवडा असल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी होती. वायदा बाजारात हरभऱ्याचे भाव अचानक वाढल्याने हरभऱ्याच्या दरात प्रति क्विंटल ३०० रुपयांची वाढ झाली आहे. हरभरा दरवाढीचे कारण किमान आधारभूत किमतीत झालेली वृद्धी आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे उत्पादनही कमी झालेले आहे.

पुढील काही दिवसात होळीच्या सणानिमित्त हरभरा डाळीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरभरा आणि हरभरा डाळीच्या दरात वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा हरभऱ्याचे उत्पादन ९० ते ९५ लाख टन होण्याची शक्यता आहे. 

हरभऱ्याचे भाव वाढलेले असल्याने डाळीच्या दरातही वाढ झालेली आहे. मसुरीचे भाव वाढल्याने मसुरीच्या डाळीचे भाव वधारले आहे. चांगल्या प्रतीच्या गव्हाचे भावही वाढलेले आहेत. तांदळाच्या दरात भाववाढ झालेली आहे. ग्राहकांकडून सोयाबीन तेलाला सर्वाधिक मागणी असून, त्याचे भाव आता प्रति १५ किलो डब्बा दोन हजारांवर पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत मोहरीचे नवीन उत्पादन बाजारात आल्यानंतर खाद्य तेलाचे कमी होण्याची शक्यता आहे, असे नागपूर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.  सोयाबीनच्या दरात वाढ  घाऊक बाजारात सोयाबीन तेलाचा १५ किलोच्या डब्यामागे १०० ते १२५ रुपयांची वाढ झाल्याने पुन्हा दोन हजार रुपयांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे सोयाबीन तेल किरकोळ बाजारात पुन्हा १३५ ते १४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. सोयाबीनसोबतच सनफ्लॉवर तेल २१५०-२२००, पामोलिन तेल १९३०-१९५० आणि राइस ब्रान तेलाचे भाव १९७०-२००० रुपये प्रति १५ किलो डब्बा पोहोचले आहेत. शेंगदाणे तेलाचे दरही २४०० रुपये प्रति १५ किलोवर पोहोचले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com