Agriculture news in marathi In Akola, the funds for excess rainfall went to the tehsildar's account | Agrowon

अवकाळी, गारपिटीमुळे  फळपिकांचे १८ लाखांचे नुकसान 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टरवरील फळपिकांचे सुमारे १८ लाख ३९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाकडे पाठविला आहे. 

सिंधुदुर्गनगरी : जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टरवरील फळपिकांचे सुमारे १८ लाख ३९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाकडे पाठविला आहे. 

जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. सह्याद्री पट्ट्यातील गावातील फळपिकांना गारपिटीचा मोठा तडाखा बसला. काजू, आंबा पिकांचे पूर्णतः नुकसान झाले. काजुला मोहोर आणि फळधारणा झालेली असताना गारपीट झाल्यामुळे काजू पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले होते. या नुकसानीचा पंचनामा कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आला होता. 

अवकाळीचा सर्वाधिक फटका वैभववाडी तालुक्याला बसला होता. या तालुक्यातील १०३ शेतकऱ्यांचे ५६ हेक्टरवरील फळपिकांचे सुमारे १० लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्या पाठोपाठ कणकवली तालुक्यातील ७६ शेतकऱ्यांचे ४४ हेक्टरवरील पिकांचे ८ लाखाचे नुकसान झाले. सावंतवाडीतील ८ शेतकऱ्यांचे २१ हजार रुपयांचे नुकसान झाले. या शिवाय उन्हाळी शेतीचे देखील नुकसान झाले आहे. कृषी विभागाने ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले. त्यानुसार जिल्ह्यातील १०१ हेक्टर क्षेत्रावरील फळपिक आणि शेतीचे सुमारे १८ लाखांचे ३९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. 

प्रतिक्रिया
जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. या नुकसानीचा अहवाल तयार करून त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर तो अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नुकसानभरपाई अद्याप प्राप्त झालेली नाही. 
- अरुण नातू, क्षेत्रविकास अधिकारी, कृषी विभाग सिंधुदुर्ग 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...