Agriculture news in marathi In Akola, the funds for excess rainfall went to the tehsildar's account | Page 2 ||| Agrowon

‘एक राज्य एक ब्रँड’ धोरण स्वीकारा; लाखगंगा ग्रामसभेत ठराव

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

अनिष्ट ब्रँड वार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारा. दूध उत्पादकांची या पुढील काळात लूटमार करता येणार नाही, यासाठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल, असा कायदा करा, आदी महत्त्वपूर्ण ठराव लाखगंगा येथे शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आले.

औरंगाबाद : अनिष्ट ब्रँड वार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारा. दूध उत्पादकांची या पुढील काळात लूटमार करता येणार नाही, यासाठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल, असा कायदा करा, आदी महत्त्वपूर्ण ठराव लाखगंगा येथे शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आले.

 दूध दरवाढीच्या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती किसान सभा व इतर समविचारी शेतकरी संघटनांनी रणसिंग फुंकले आहे. याला प्रतिसाद म्हणून वैजापूर तालुक्यातील लाखगंगा ग्रामपंचायत ने शुक्रवारी (ता. १८) ग्रामसभेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात ठराव घेतला आहे.
लाखगंगा पुन्हा एकदा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरते आहे.

परवड मांडलेल्या दूध उत्पादकांच्या प्रश्नावर लाखगंगा येथे शुक्रवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला किसान सभेचे डॉ. अजित नवले, शेतकरी नेते धनंजय पाटील-धोरडे, जि. प. सदस्य पंकज ठोंबरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर जगताप, राजेंद्र कराळे, पुणतांबा ग्रामपंचायतीचे सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे, लाखगंगा सरपंच उज्वला सचिन पडवळ आदी उपस्थित होते.

ग्रामसभेतील ठरावाच्या इतर मागण्या

  •   ज्या खासगी व सहकारी दूध संघांनी लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत दूध खरेदीचे दर पाडले, त्या सर्व दूध संघाचे ऑडिट करा.
  •   दुधाची मागणी किती घटली, त्या प्रमाणात किती दर कमी देण्यात आले याची सखोल चौकशी करा. परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्याची लूटमार करणाऱ्या खासगी व सहकारी दूध संघावर 
  • कठोर कारवाई करा.
  •   झालेली लुटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा व लॉकडाउन पूर्वी मिळत असलेला प्रति लिटर ३५ रुपये दर तातडीने सुरू करा. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफआरपी व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरिंग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करा.
  •   दूध भेसळ बंद करा, टोंड दुधावर बंदी आणा, भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करा. ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात होईल उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या.
  • प्रतिक्रिया

लॉकडाउनमध्ये रुग्णालयाचे सरकारने ऑडिट केले. तोच नियम लावून दूध उत्पादकांची जी लूट झाली, त्या दूधसंघांचे पण सरकारने ऑडिट करावे. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आंदोलनासाठी मजबूर करू नये.
- डॉ. अजित नवले, शेतकरी नेते, किसान सभा


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...