agriculture news in Marathi, Akola in gram of Rs 3500 to Rs 4111 rupes per quintal | Agrowon

अकोल्यात हरभरा प्रतिक्विंटल ३५०० ते ४१११ रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 मार्च 2019

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हरभऱ्याची अावक होत असून सोमवारी (ता. ११) हरभऱ्याची २६०० क्विंटलची आवक झाली होती. हरभऱ्याचा दर कमीत कमी ३५०० व जास्तीत जास्त ४१११ रुपये होता. सरासरी ४०२५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हरभऱ्याची अावक होत असून सोमवारी (ता. ११) हरभऱ्याची २६०० क्विंटलची आवक झाली होती. हरभऱ्याचा दर कमीत कमी ३५०० व जास्तीत जास्त ४१११ रुपये होता. सरासरी ४०२५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

हरभरा हंगाम सध्या सुरू अाहे. यामुळे बाजारपेठेत हरभऱ्याची अावक टिकून अाहे. सोयाबीनचा दर ३१५० ते ३६१५ रुपये प्रतिक्विंटलला होता. तसेच ३५८० रुपये सरासरी दर मिळाला. सोयाबीनची अावक ही १२९७ क्विंटल झाली होती. तुरीची ९१० पोत्यांची अावक झाली होती. तुरीला प्रतिक्विंटल कमीत कमी ४२०० व जास्तीत जास्त ५२०० रुपये दर होता. सरासरी ५१०० रुपये दर भेटला. 

गव्हाची अावक ७७५ क्विंटल झाली होती. गहू कमीत कमी १६५० व जास्तीत जास्त २१०० रुपये दराने विक्री झाला. मुगाचा दर ४००० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटल होता. ३१ क्विंटल अावक झाली होती. उडदाला ३८०० व जास्तीत जास्त ४४०० रुपये दर मिळाला. ४२०० रुपये सरासरी दर होता. २१ पोत्यांची अावक झाली होती. ज्वारीची ६९ क्विंटल अावक झाली होती. ज्वारीला १५०० हा कमीत कमी व १९०० रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. सरासरी १८८० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. 

मक्याची तीन पोत्यांची अावक होती. १९५० कमीत कमी व २१५० रुपये जास्तीत जास्त दर होता. सरासरी २०५० रुपये प्रतिक्विंटलने मक्याची विक्री करण्यात अाली. बाजारात पांढऱ्या हरभऱ्याची ३२ पोत्यांची अावक झाली होती. ४००० ते ४७०० रुपयांचा दर मिळाला. बरबटीची १३ पोते अावक होती. तर दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल होता.
 

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...