महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
ताज्या घडामोडी
अकोल्यात हरभरा प्रतिक्विंटल ३९०० ते ४३५० रुपये
अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. १६) हरभऱ्याची २८१० क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला सरासरी ४२०० रुपये दर मिळाला. हरभऱ्याला जास्तीत जास्त ४३५० व कमीत कमी ३९०० रुपये दर होता. येथील बाजार समितीत हरभऱ्याची सध्या आवक वाढलेली दिसून येत आहे.
सोयाबीनची आवकही दीड हजार क्विंटलपेक्षा अधिक होती. सोयाबीनची १५४२ क्विंटल आवक झाली. सोयाबीनचा कमीत कमी दर ३३५० व जास्तीत जास्त ३६६० रुपये होता. सरासरी ३६१५ रुपये भाव मिळाला.

या बाजार समितीत तुरीची आवकही सध्या वाढलेली आहे. तुरीची १५०० क्विंटलपर्यंत आवक झाली. तुरीचा दर ४२०० ते ५३५० दरम्यान होता. सरासरी ५२५० रुपये दर मिळाला. मूग तसेच उडदाची आवक कमी झाली आहे. मुगाची सात पोते तर उडदाची २९ पोते आवक झाली होती. मुगाला ४४०० ते ५५०० दरम्यान भाव होता. सरासरी ५३०० रुपये दर मिळाला. उडदाचा दर ४००० ते ४५०० रुपये दरम्यान होता. सरासरी ४४७५ रुपये दर मिळाल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.
गव्हाची आवक ७८५ पोते झाली होती. तर शरबती गव्हाची २१५ क्विंटलची आवक होती. गव्हाला १५५० ते २०३० रुपये प्रतिक्विंटलचा दर भेटला. सरासरी १७६० रुपये दर होता. शरबती गव्हाचा दर २०५० ते २६०० रुपये होता. २३०० रुपये सरासरी भाव मिळाला. ज्वारीची आवक कमी म्हणजेच ३४ पोते झाली होती.
ज्वारीला कमीत कमी १८२५ ते जास्तीत जास्त १९५० रुपये दर भेटला. मक्याची आवक अवघी सहा पोते होती. मक्याला १८०० रुपये क्विंटलचा दर होता.
पांढरा हरभरा ४००० ते ४८०० रुपये दरम्यान विक्री झाला. २५ पोत्यांची आवक झाली होती. बरबटीची एक पोत्याची आवक होती. बरबटीला ३ हजारांचा प्रतिक्विंटल दर होता.
- 1 of 583
- ››