कृषी योजनांच्या अंमलबजावणीत अकोला अव्वल

जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या योजनांची अंमलबजावणी व त्याचे साध्य यामध्ये सन २०१९- २० या वर्षांसाठी अकोला राज्यात अव्वल ठरला आहे. कृषी खात्याने नुकतीच ही श्रेयावली जाहीर केली असून यात अकोला अग्रस्थानी तर नांदेड शेवटच्या स्थानावर आहे.
Akola leads in implementation of agricultural schemes
Akola leads in implementation of agricultural schemes

अकोला ः जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या योजनांची अंमलबजावणी व त्याचे साध्य यामध्ये सन २०१९- २० या वर्षांसाठी अकोला राज्यात अव्वल ठरला आहे. कृषी खात्याने नुकतीच ही श्रेयावली जाहीर केली असून यात अकोला अग्रस्थानी तर नांदेड शेवटच्या स्थानावर आहे. जिल्ह्याला ६६.५२ गुण मिळाले असून नांदेडला ४८.४८ गुण प्राप्त झाले.

राज्यात कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनात रिझल्ट फ्रेमवर्क डॉक्युमेंट अंतर्गत विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मूल्यांकनाकरिता गूगल स्प्रेडशीट तयार करण्यात आले होते. त्यानुसार सन २०१९-२० मध्ये जिल्ह्यामार्फत राबविण्यात आलेल्या कृषी विभागाच्या विविध योजनांच्या मार्च २०२० अखेरची उद्दिष्ट व साध्याची आकडेवारी गृहीत धरण्यात आली. त्यावरून विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे मूल्यांकन करून गुणानुक्रम काढण्यात आले.

या काळात अकोल्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदी मोहन वाघ कार्यरत होते. जिल्ह्यात कृषी विभागात तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, तांत्रिक स्वरूपाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असतानाही वाघ यांनी योजनांच्या अंमलबजावणीसाठी धडक उपक्रम राबविले. योजनांचा रखडलेला निधी शेतकऱ्यांना तातडीने देण्यासाठी वेळोवेळी बैठका घेतल्या.

विभागात अमरावतीची बाजी विभागाचेही मूल्यांकन काढण्यात आले. यात अमरावती विभाग ६३.६२ गुण मिळवून अव्वल स्थानी आला आहे. तर लातूर शेवटच्या म्हणजे आठव्या स्थानावर आहे. विभागात कोल्हापूर दुसरा, पुणे तिसरा, नाशिक चौथा, औरंगाबाद पाचव्या, ठाणे सहाव्या तर नागपूर विभाग सातव्या स्थानावर आहे.

मी जितके महिने अकोल्यात काम केले त्यातील प्रत्येक दिवस शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ कसा पोचेल यासाठी काम केले. कर्मचारी कमतरता असतानाही कार्यरत असलेल्यांना सोबत घेत योजना अंमलबजावणीला गती देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. त्यातून हे ध्येय गाठणे शक्य झाले. - मोहन वाघ, तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com