Agriculture news in Marathi Akola leads in implementation of agricultural schemes | Agrowon

कृषी योजनांच्या अंमलबजावणीत अकोला अव्वल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या योजनांची अंमलबजावणी व त्याचे साध्य यामध्ये सन २०१९- २० या वर्षांसाठी अकोला राज्यात अव्वल ठरला आहे. कृषी खात्याने नुकतीच ही श्रेयावली जाहीर केली असून यात अकोला अग्रस्थानी तर नांदेड शेवटच्या स्थानावर आहे.

अकोला ः जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या योजनांची अंमलबजावणी व त्याचे साध्य यामध्ये सन २०१९- २० या वर्षांसाठी अकोला राज्यात अव्वल ठरला आहे. कृषी खात्याने नुकतीच ही श्रेयावली जाहीर केली असून यात अकोला अग्रस्थानी तर नांदेड शेवटच्या स्थानावर आहे. जिल्ह्याला ६६.५२ गुण मिळाले असून नांदेडला ४८.४८ गुण प्राप्त झाले.

राज्यात कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनात रिझल्ट फ्रेमवर्क डॉक्युमेंट अंतर्गत विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मूल्यांकनाकरिता गूगल स्प्रेडशीट तयार करण्यात आले होते. त्यानुसार सन २०१९-२० मध्ये जिल्ह्यामार्फत राबविण्यात आलेल्या कृषी विभागाच्या विविध योजनांच्या मार्च २०२० अखेरची उद्दिष्ट व साध्याची आकडेवारी गृहीत धरण्यात आली. त्यावरून विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे मूल्यांकन करून गुणानुक्रम काढण्यात आले.

या काळात अकोल्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदी मोहन वाघ कार्यरत होते. जिल्ह्यात कृषी विभागात तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, तांत्रिक स्वरूपाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असतानाही वाघ यांनी योजनांच्या अंमलबजावणीसाठी धडक उपक्रम राबविले. योजनांचा रखडलेला निधी शेतकऱ्यांना तातडीने देण्यासाठी वेळोवेळी बैठका घेतल्या.

विभागात अमरावतीची बाजी
विभागाचेही मूल्यांकन काढण्यात आले. यात अमरावती विभाग ६३.६२ गुण मिळवून अव्वल स्थानी आला आहे. तर लातूर शेवटच्या म्हणजे आठव्या स्थानावर आहे. विभागात कोल्हापूर दुसरा, पुणे तिसरा, नाशिक चौथा, औरंगाबाद पाचव्या, ठाणे सहाव्या तर नागपूर विभाग सातव्या स्थानावर आहे.

मी जितके महिने अकोल्यात काम केले त्यातील प्रत्येक दिवस शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ कसा पोचेल यासाठी काम केले. कर्मचारी कमतरता असतानाही कार्यरत असलेल्यांना सोबत घेत योजना अंमलबजावणीला गती देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. त्यातून हे ध्येय गाठणे शक्य झाले.
- मोहन वाघ, तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी


इतर बातम्या
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध...बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक... नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे...
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके...सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस,...
धरणांतील पाण्याच्या विसर्गात घटपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत...
पुण्यात पंचनामे गतीने सुरूपुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग...
परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी...परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून...
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह...
सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची...सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि...
पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक,...नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१...
खानदेशात भिज पाऊसजळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते...
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा...रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६...
हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभारहिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना...
नाशिक विभागात मिळाल्या १६३१ भूमिहीनांना...नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व...
नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपयेपाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील...