अकोला झेडपीच्या आवारातच दूध संकलन, विक्री

Akola Milk collection, sale within ZP premises
Akola Milk collection, sale within ZP premises

अकोला ः लाभार्थी अार्थिक दृष्ट्या सक्षम व्हावेत; त्यांना कायमस्वरुपी स्वयंराेजगाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येणाऱ्या दुर्धपूर्णा याेजनेअंतर्गत अाता जि.प.च्या अावारातच  दूध संकलन व विक्री तसेच दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे केंद्र सुरू हाेणार अाहे. नवीन सत्ता स्थापनेपूर्वीच हे केंद्र सुरु हाेण्यासाठी हालचाली करण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. 

समाज कल्याण विभागाअतंर्गत १५ योजना राबविण्यात येतात. या याेजनांच्या माध्यमातून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. दुधाळ जनावरांचेही वितरण करण्यात येते. दुधाळ जनावरे वितरणासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात अाली हाेती. यासाठी  जि.प.ला. अर्ज प्राप्त झाले हाेते. पात्र ६६४ अर्जांपैकी ५२१  लाभार्थ्यांची निवड करण्यात अाली. दुर्धपूर्णा याेजनेंतर्गत दुध उत्पादक संघाची स्थापनाही करण्यात अाली.

या याेजनेसाठी पाच काेटींची तरतूद करण्यात अाली अाहे.  दरम्यान दूध संकलन व विक्री तसेच दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र उभारण्यात असून, नियोजित कामाची पाहणी  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हरिप्रसाद मिश्रा  यांनी दाेन दिवसांपूर्वी केली हाेती.

अशी अाहे याेजना; असे हाेणार फायदे जिल्हा परिषद लाभार्थ्यांना ८५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत अाहेत. हे अनुदान कर्ज खात्यात जमा हाेत अाहे. लाभार्थ्यांना दाेन जनावरे घ्यावी लागत अाहेत. लाभार्थ्यांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दुग्ध उत्पादक सोसायटीची नाेंदणी करण्यात अाली अाहे. अमूल दूधच्या धर्तीवर जिल्ह्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा मानस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात अाला अाहे.  लाभार्थ्यांना महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत पुढील वर्षी जनावरांचा गोठा व बायोगॅस देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com