अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५१०० रुपये

अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५१०० रुपये
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५१०० रुपये

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक ११०० क्विंटल झाली होती. तुरीला कमीत कमी ४२०० व जास्तीत जास्त ५१०० रुपये दर मिळाला. सरासरी ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. मंगळवारी (ता. २६) बाजारात ११०० क्विंटलची आवक झाली होती.

या बाजारात सोयाबीनची आवक १३८१ पोत्यांची होती. सोयाबीन कमीत कमी ३१०० व जास्तीत जास्त ३६४० रुपये दराने विक्री झाली. ३६०० रुपये सरासरी दर होते. हरभऱ्याची आवक १८०८ क्विंटल झाली होती. हरभऱ्याचा किमान दर ३५०० व कमाल ४१०० रुपयांचा दर होता. सरासरी ३९०० हा दर शेतकऱ्यांच्या हातात पडला. हरभरा (पांढरा) ३५०१ ते ५१११ रुपये दराने विक्री झाला. ५०५० रुपये सरासरी दर होता. ११० क्विंटल हरभऱ्याची विक्री झाली. बाजारात गव्हाची आवक ६०० क्विंटलपेक्षा अधिक झाली होती. गव्हाचा दर १७०० ते २१०० दरम्यान होता. सरासरी १९०० रुपये दराने विक्री झाली.   

उडदाचीही आवक सध्या कमी झाली आहे. उडदाचे दर मात्र टिकून आहेत. उडीद सरासरी २७०० ते ४३०० दरम्यान विकत आहे. सरासरी ४१०० रुपयांचा दर होता. मुगाला सरासरी ५००० रुपयांचा दर मिळाला. कमीत कमी ४४०० व जास्तीत जास्त ५७०० रुपये दर होता. आवक नाममात्र १५ पोत्यांची झाली होती.

बाजरीची पाच पोते आवक होती. १८०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. तिळाची दोन पोत्यांची आवक झाली. सरासरी ५१०० रुपये दर होता. ज्वारीचा दर कमीत कमी १६०० व जास्तीत जास्त १९५० आणि सरासरी १८३५ रुपये होता. ८४ पोते आवक झाली होती. मक्याचे १० पोते विक्रीला आले होते. २०४० रुपयांचा दर मक्याला भेटला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com