अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९०० रुपये 

अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९०० रुपये 
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९०० रुपये 

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. ९) तुरीची ७३४ क्विंटल आवक झाली. तुरीला कमीत कमी ५००० व जास्तीत जास्त ५९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी ५८५० रुपये मिळाला असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. 

बाजार समितीत हरभऱ्याची सध्या कमी झालेली आहे. ४३५ क्विंटलची आवक झाली होती. हरभऱ्याला कमीत कमी ४०५० ते ४३२५ दरम्यान होता. सरासरी ४३२५ रुपये भाव मिळाला.

सोयाबीनची आवक या बाजार समितीत हजार क्विंटलच्या आत आली आहे.  सोयाबीनचा दर ३३०० ते ३५६० असा होता. सरासरी ३५०० रुपये दर मिळाला. ८१६ क्विंटलची आवक झाली होती. ज्वारीचा दर १६०० रुपये मिळाला. बाजारात केवळ दोन पोते ज्वारीची आवक झाली. गव्हाची ३० क्विंटल आवक झाली. गव्हाला प्रतिक्विंटल १८५० ते १९२५ तर सरासरी १९०० रुपये असा दर मिळाला.  शरबती गव्हाची ८७ क्विंटल आवक झाली होती. 

या गव्हाला प्रतिक्विंटल २१५० ते २७०० तर सरासरी २५०० रुपये असा दर होता. उडदाचा दर ४००० ते ४८०० असा होता. सरासरी ४७०० रुपये दर मिळाला. १६७ क्विंटल आवक झाली होती. मुगाची ७१ क्विंटल आवक व ४६०० ते ५७०० दरम्यान दर मिळाला. ५५०० रुपये सरासरी दर होता. मोहरीची २ क्विंटल आवक झाली होती. ३५०० रुपये दर मिळाला. 

सध्या पेरण्यांचा हंगाम तसेच शेतीतील कामे जोरात सुरू असल्याने बाजारपेठेतील आवकेवर परिणाम झाल्याचेही सूत्रांचे मत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com