अकोल्यात उडीद प्रतिक्विंटल सरासरी ४६०० रुपये

अकोल्यात उडीद प्रतिक्विंटल सरासरी ४६०० रुपये
अकोल्यात उडीद प्रतिक्विंटल सरासरी ४६०० रुपये

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक झालेल्या उडदाला ४५०० ते ५००० रुपये असा दर मिळाला. सरासरी ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर भेटला. नवीन उडदाची आवक येत्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. मंगळवारी (ता. १७) ३८ पोत्यांची आवक झाली होती. 

मागील आठवड्यापासून सुरू असलेला संततधार पाऊस काहीसा ओसरला आहे. यामुळे आता बाजारपेठेतील आवक वाढू शकते. बहुतांश ठिकाणी मुगाची काढणी वेगाने सुरू झाली. यामुळे आवकसुद्धा हळूहळू वाढत आहे. येथील बाजार समितीत मुगाची २७६ पोत्यांची आवक होती. मुगाला कमीत कमी ३५०० व जास्तीत जास्त ५३०० असा दर भेटला. सरासरी ४७०० रुपये भाव होता.

या बाजार समितीत सोयाबीनची ६१४ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला कमीत कमी ३३०० व जास्तीत जास्त ३७०० रुपये दर होता.  सरासरी ३६५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजारात तुरीची सर्वाधिक ७१२ क्विंटल आवक होती. तुरीला कमीत कमी ४५०० व जास्तीत जास्त ५५५० भाव होता. सरासरी ५४०० रुपये दर होता. हरभऱ्याला ३६०० ते ४२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी ४१५० रुपये दर होता. 

बाजारात ५६३ क्विंटलची आवक झाली होती. गव्हाची आवक १४० क्विंटल झाली होती. गव्हाला प्रतिक्विंटल १८११ ते २१५० तर सरासरी २०९० रुपये असा दर मिळाला. ज्वारीची २७ क्विंटल आवक झाली होती. १६०० ते २३११ रुपये दराने विक्री झाली. सरासरी २००० रुपये भाव मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com