अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी मतदान

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुक कार्यक्रमानुसार मंगळवारी (ता. ५) अकोला, वाशीम जिल्ह्यात मतदान प्रक्रिया राबवण्यात आली.
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी मतदान
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी मतदान

अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुक कार्यक्रमानुसार मंगळवारी (ता. ५) अकोला, वाशीम जिल्ह्यात मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. अकोला जिल्हा परिषदेच्या १४ गट आणि २८ गणांसाठी तर वाशीममध्ये १४ गट आणि २७ गणांमध्ये रिक्त पदांसाठी निवडणूक होत आहे. अकोल्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४३.१७ टक्के, तर वाशीममध्मे ४७.३७ टक्के मतदान झाले होते.  ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अकोला, वाशीम जिल्हा परिषदा, तसेच त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांमधील पदे रिक्त झाली होती. ही पदे भरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी मतदान सुरू झाले. शेतशिवारांमध्ये सोयाबीन सोंगणीसह इतर कामांची लगबग असल्याने मतदानाची टक्केवारी फारशी वाढलेली नव्हती. दुपारी शेतकरी, मजूर कामांवरून परतल्यानंतर मतदानाला वेग आला. अकोला जिल्ह्यात दुपारपर्यंत ४३.१७  टक्के सरासरी मतदान झाले होते. यात एक लाख ८९४२ मतदारांनी मतदान केले. यात ६३ हजार ६३२ पुरुष व ४५ हजार ३१० महिलांचा समावेश होता. वाशीम जिल्ह्यात दुपारपर्यंत सरासरी ४७.३७ टक्के मतदान झाले होते. या जिल्ह्यात एक लाख २७८४९ मतदारांनी अधिकार बजावला होता. यात ६९०८५ पुरुष आणि ५८७६४ महिला मतदारांचा समावेश होता. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने गेले काही दिवस अकोला व वाशीम जिल्ह्यांतील वातावरण ढवळून निघाले होते.  महाविकास आघाडीतील घटकपक्ष, भाजप, वंचित बहुजन आघाडीने ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. बुधवारी (ता. ६) सकाळी १० वाजेपासून मतमोजणी केली जाणार आहे. यानंतरच जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांमधील राजकीय सत्ता समीकरणे स्पष्ट होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com