agriculture news in marathi Akola Washim byelections of zilla parishad and Panchayat Samiti | Page 3 ||| Agrowon

अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी मतदान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुक कार्यक्रमानुसार मंगळवारी (ता. ५) अकोला, वाशीम जिल्ह्यात मतदान प्रक्रिया राबवण्यात आली.

अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुक कार्यक्रमानुसार मंगळवारी (ता. ५) अकोला, वाशीम जिल्ह्यात मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. अकोला जिल्हा परिषदेच्या १४ गट आणि २८ गणांसाठी तर वाशीममध्ये १४ गट आणि २७ गणांमध्ये रिक्त पदांसाठी निवडणूक होत आहे. अकोल्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४३.१७ टक्के, तर वाशीममध्मे ४७.३७ टक्के मतदान झाले होते. 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अकोला, वाशीम जिल्हा परिषदा, तसेच त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांमधील पदे रिक्त झाली होती. ही पदे भरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी मतदान सुरू झाले. शेतशिवारांमध्ये सोयाबीन सोंगणीसह इतर कामांची लगबग असल्याने मतदानाची टक्केवारी फारशी वाढलेली नव्हती.

दुपारी शेतकरी, मजूर कामांवरून परतल्यानंतर मतदानाला वेग आला. अकोला जिल्ह्यात दुपारपर्यंत ४३.१७  टक्के सरासरी मतदान झाले होते. यात एक लाख ८९४२ मतदारांनी मतदान केले. यात ६३ हजार ६३२ पुरुष व ४५ हजार ३१० महिलांचा समावेश होता. वाशीम जिल्ह्यात दुपारपर्यंत सरासरी ४७.३७ टक्के मतदान झाले होते. या जिल्ह्यात एक लाख २७८४९ मतदारांनी अधिकार बजावला होता. यात ६९०८५ पुरुष आणि ५८७६४ महिला मतदारांचा समावेश होता. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने गेले काही दिवस अकोला व वाशीम जिल्ह्यांतील वातावरण ढवळून निघाले होते. 

महाविकास आघाडीतील घटकपक्ष, भाजप, वंचित बहुजन आघाडीने ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. बुधवारी (ता. ६) सकाळी १० वाजेपासून मतमोजणी केली जाणार आहे. यानंतरच जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांमधील राजकीय सत्ता समीकरणे स्पष्ट होतील.


इतर ताज्या घडामोडी
सांगलीत दोन महिन्यांत डीएपीचा रॅक आलाच...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ५२...
जिल्हा बॅंक निवडणुकीतून खासदार...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक...
सांगली मार्केट यार्डात हळद-गूळ...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
तमिळनाडूला पावसाने झोडपले..चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सरकारकडून...मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये...
‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात...नागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक...
तेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री...हैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात...
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या...नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा...
सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर...सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील संतगोळ...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच, शेतकऱ्यांच्या...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात...
लखीमपूर खेरी हिंसाचार : माजी...नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशाभारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के...रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे...
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे...नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने...
गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा...गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला...