अकोला, वाशीम जिल्हा परिषदांचा आज फैसला

Akola, Washim Zilla Parishad decision today
Akola, Washim Zilla Parishad decision today

अकोला ः अकोला व वाशीम जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी मंगळवारी (ता. ७) मतदान झाले. सकाळी सुरुवातीच्या काळात संथगतीने झालेली ही प्रक्रिया दुपारनंतर मात्र वेगाने सुरू होती. प्रत्येक ठिकाणी मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह होताच. शिवाय मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोचविण्यासाठी राजकीय कार्यकर्ते सक्रियपणे काम करीत होते.

बुधवारी (ता. ८) मतमोजणी होणार असून, निकालांकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत अकोल्यात ४७.७ टक्के, तर वाशीम जिल्ह्यात सरासरी ४२.७१ टक्के मतदान झाले होते.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांत मागील आठवडाभरापासून राजकारण तापले होते. प्रामुख्याने सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागलेली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मोठी निवडणूक होत असल्याने याकडे लक्ष लागलेले आहे.

वास्तविक या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्थापन होईल, अशी शक्यता होती. परंतु अखेरपर्यंत जागा वाटपावरून समाधान न झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना बऱ्याच गट व गणांत समोरासमोर आहेत. तर भाजप व बहुजन वंचित आघाडी सुरुवातीपासूनच स्वतंत्रपणे लढले. यामुळे अनेक गट, गणांत चौरंगी, पंचरंगी लढती झाल्याने मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाली. यामुळे धक्कादायक निकालांची शक्यता वाढलेली आहे.  

दुपारी तीन वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात चार मतदारांनी हक्क बजावला होता. तेल्हारा तालुक्यात ५०.०४ अकोट ४५.४९, मूर्तिजापूर ४५.०१, अकोला ४६.४२ बाळापूर ४५.८० बार्शीटाकळी ४९.१८आणि पातूर तालुक्यात ४८.७० टक्के मतदान झाले होते.

दुपारी लागल्या रांगा सकाळी मतदानाला संथ सुरुवात झाली. थंडीमुळे सुरुवातीच्या टप्प्यात कमी असलेली गर्दी मात्र नंतर वाढत गेली. दहा वाजेपासून गर्दीमुळे रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या. दुपारी तर स्त्री-पुरुष मतदारांच्या रांगा होत्या. मतदानात असलेला उत्साह कुणाच्या पारड्यात पडतो हे बुधवारी मतमोजणीतून समोर येईल.

आज मतमोजणी  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी बुधवारी (ता. ८) सकाळी दहा वाजल्यापासून केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील गट व गणांची मतमोजणी त्याच ठिकाणी केली जाईल. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व ठिकाणची मतमोजणी पूर्ण होईल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com