agriculture news in marathi Akola zilla parishad agriculture land given on Tenant to farmers | Page 2 ||| Agrowon

अकोला ‘झेडपी’च्या जमिनीला मिळाला २२ लाखांवर भाडेपट्टा

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

अकोला : जिल्हा परिषदेच्या मालकीची असलेली शेती ११ महिन्याच्या भाडेपट्ट्याने वहितीसाठी देण्यात आली आहे. या १५५ एकर जमिनीसाठी यंदा विक्रमी १९ लाख ४० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

अकोला : जिल्हा परिषदेच्या मालकीची असलेली शेती ११ महिन्याच्या भाडेपट्ट्याने वहितीसाठी देण्यात आली आहे. या १५५ एकर जमिनीसाठी यंदा विक्रमी १९ लाख ४० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. हाता (ता. बाळापूर) आणि निंबी मालोकार शिवारातील जमिनीचा भाडेपट्टा झाला. 

जिल्हा परिषदचे कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या लिलावावेळी कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा अधिकारी विद्या पवार आदी उपस्थित होते. 

जिल्हा परिषदेच्या मालकीची हाता व अकोला तालुक्यातील निंबी मालोकार या ठिकाणी शेती आहे. ही शेती दरवर्षी शेतकऱ्यांना ११ महिन्याच्या भाडेपट्ट्याने दिली आहे. हाता येथील लिलावात गट नंबर ७६५ मधील ४० एकर शेती ३ लाख ६६ हजारात तर गट नंबर २४० मधील ३० एकर ३ लाख ५६ हजार, गट नंबर २४० मधील ४५ एकर शेत ६ लाख ११ हजार तर गट नंबर ५६७ मधील ४० एकर शेती सहा लाख सात हजारात दिल्या गेली.

लिलाव पद्धतीने या शेतीसाठी शेतकऱ्यांनी बोली लावली. यंदा या १५५ एकरासाठी १९ लाख ४० हजार रुपये मिळाले आहेत. यापूर्वी कधीही ही शेती एवढ्या रकमेपर्यंत भाडेपट्ट्याने गेली नव्हती. संतोष चांडक, लक्ष्मण मावळे, राहुल गावंडे, केशव वासनकर यांनी ही जमीन ११ महिन्यासाठी वहितीसाठी लिलावात घेतली. 

निंबी मालोकार येथील शेती २ लाख ७५ हजारांत
जिल्हा परिषदेच्या मालकीची ३५ एकर शेती अकोला तालुका येथील मौजे निंबी मालोकार शिवारात आहे. या शेतीचा शुक्रवारी (ता.१६) कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांच्या उपस्थितीत अकरा महिन्यांच्या कालावधीकरिता लिलाव झाला. लिलावात या जमिनीला दोन लाख ७५ हजार रुपये मोबदला मिळाला. निंबी मालोकार शिवारातील शेती लिलावामध्ये दिनेश मालोकार आणि महावीर यादव  या शेतकऱ्यांनी भाग घेतला. दिनेश मालोकार यांनी ही शेत अकरा महिन्याच्या वहितीसाठी लिलावात घेतले. या वेळी जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) मिलिंद जंजाळ, ज्ञानेश्वर दखणे, विजय धाडवे, रोखपाल गोपाल मोहोळ, कृषी अधिकारी एस. पी. अली, ग्रामसेवक संजय गवळी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...