agriculture news in marathi Akola zilla parishad Election ball in Collectors Court | Agrowon

वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 सप्टेंबर 2021

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या १४ व पंचायत समितीच्या २७ जागांची पोट निवडणूक घेण्याबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे. सध्या निवडणूक घेण्यासारखी परिस्थिती आहे का? याबाबत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यास सांगण्यात आले आहे. 

वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या १४ व पंचायत समितीच्या २७ जागांची पोट निवडणूक घेण्याबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे. सध्या निवडणूक घेण्यासारखी परिस्थिती आहे का? याबाबत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यास सांगण्यात आले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्यात एका जनहित याचिकेवर निर्णय देत राज्यातील पाच जिल्हा परिषदांतील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर गेल्याने, इतर मागास प्रवर्गातील पदे रिक्त केली होती. त्यामध्ये वाशीम जिल्हा परिषदेतील १४ सदस्य अपात्र ठरले होते.

इतर मागास प्रवर्गातील २७ पंचायत समिती सदस्यही अपात्र झाले होते. मात्र दोन महिन्यांनंतर निवडणूक आयोगाने या रिक्त जागा सर्व सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यानंतर याही निवडणूक कार्यक्रमाला खुद्द निवडणूक आयोगानेच स्थगिती दिली होती. आता पुन्हा दोन महिन्यांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल मागितला आहे. 

कोविडची परिस्थिती व इतर घटकांबाबत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत निवडणूक घेणे शक्य आहे काय, याचीही विचारणा करण्यात आली आहे. सार्वजनिक उत्सवावर बंदी असताना जिल्हाधिकारी कार्यालय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

  ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण खारीज झाल्यानंतर राज्य सरकारने ओबीसीना जनगणनेनुसार आरक्षण देण्याचे सूतोवाच केले होते. मात्र अजून त्यामध्ये कोणतीही प्रगती झाली नाही. आरक्षणावर निर्णय झाला नाही तर ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित राहावे लागू शकते, अशी भीती जाणकार व्यक्त करीत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन...पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार...
जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन...
कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून...कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष...
पीकविम्याप्रश्‍नी केंद्र सरकार म्हणणे...उस्मानाबाद : गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी...
गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर कराभडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
साठा मर्यादा निर्णयाची  राज्यात... हिंगणघाट, जि. वर्धा :  केंद्र सरकारने गरज...
`ई-पीक पाहणी चौदा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या...
भारनियमन केले जाणार नाही; वीजनिर्मिती...मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी...
पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात...नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत...
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७...वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या...
संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड  नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची...
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
`कुरनूर’मधून २१०० क्युसेकचा विसर्गसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी...
सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकाची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कापूस वेचणीचा खर्च सात रुपये प्रतिकिलोजळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे...
खानदेशात एकच केळी दर जाहीर करावाजळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर...