Agriculture news in Marathi Akola Zilla Parishad got Rs 15 lakh from land lease | Page 2 ||| Agrowon

अकोला जिल्हा परिषदेला जमीन भाडेपट्ट्यातून मिळाले १५ लाख

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

अकोला ः जिल्ह्यात दोन ठिकाणी परिषदेच्या मालकीची शेती असून दहा महिन्यांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. यावर्षी १९० एकर जमिनीच्या बोलीतून जिल्हा परिषदेला १५ लाख ६८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाच्या काळात एकीकडे उत्पन्नाचे स्त्रोत कमी झालेले असताना जिल्हा परिषदेला शेतीने आधार दिला आहे.

अकोला ः जिल्ह्यात दोन ठिकाणी परिषदेच्या मालकीची शेती असून दहा महिन्यांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. यावर्षी १९० एकर जमिनीच्या बोलीतून जिल्हा परिषदेला १५ लाख ६८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाच्या काळात एकीकडे उत्पन्नाचे स्त्रोत कमी झालेले असताना जिल्हा परिषदेला शेतीने आधार दिला आहे.

अकोला जिल्हा परिषदेची बाळापूर तालुक्यातील निंबी मालोकार आणि हाता अंदुरा या ठिकाणी १९० एकर शेती आहे. ही शेती खरिपात लागवडीसाठी दरवर्षी शेतकऱ्यांना ठोक्याने दिली जाते. यंदा या जमिनीचा नुकताच लिलाव करण्यात आला. दहा महिन्यांच्या भाडेपट्टयाने ही शेती शेतकऱ्यांनी ताब्यात घेतली. या एकूण शेतीच्या भाडेपट्ट्यातून १५ लाख ६८ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.

सध्या कोरोनामुळे शासनाचे उत्पन्नाचे स्त्रोत थांबलेले आहेत. करवसुली, योजनांसाठी निधी खर्च थांबलेला आहे. अशा काळात शेतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला तब्बल १५ लाख ६८ हजार रुपये मिळाले.

जिल्हा परिषेदच्या मालकीची दोन ठिकाणी जमीन आहे. ही जमीन आपण दरवर्षी दहा महिन्याच्या ठोक्याने देतो. ही प्रक्रिया बोली पद्धतीने राबविल्या जाते. यासाठी मागील पाच वर्षात आलेल्या रकमेची सरासरी काढून दर निश्‍चित करतो. त्यानुसार यंदा विक्री झाली. यातून जिल्हा परिषदेला १५ लाख ६८ हजार रुपये उत्पन्न मिळाले. हा निधी जिल्हा परिषद शेष फंडात टाकणार आहोत. त्यातून जिल्हा परिषद शेतकऱ्यांसाठी योजना राबवेल.
- डॉ. मुरली इंगळे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, अकोला


इतर बातम्या
सीईटीऐवजी गुणांद्वारे कृषी...अमरावती ः बारावीनंतर कृषी अभ्यासक्रमाला...
वीजबिले माफ न केल्यास कंपनीचे कार्यालय...बुलडाणा ः लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्यांचे...
सत्तास्थापनेसाठी भाजपकडूनच विचारणा केली...मुंबई : सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन...
वऱ्हाडात दूधाचे दर स्थिरअकोला ः या भागातील दूध संघ डबघाईस आल्याने दूध...
वाशीम जिल्ह्यावर खरिपात पावसाची कृपावाशीम ः जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत...
वर्धा जिल्ह्यात दूध उत्पादकांना दराचा...नागपूर ः लॉकडाउनमुळे मागणी घटल्याचे सांगत खासगी...
नाशिकमध्ये कमी दूध दरामुळे उत्पादकांची...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार...
वीज बिले माफ न केल्यास उद्रेक ः...नाशिक : लॉकडाऊन काळात वीज कंपन्यांनी घरगुती वीज...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश;तरीही चार...पुणे: पंतप्रधान पॅकेजमधून राबविण्यात आलेल्या...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...
दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी...पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध...
राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत...
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...