Agriculture news in Marathi Akola Zp in Bharips chairmen and washim in nationalist patrys chairmen | Agrowon

अकोल्यात भारिप, वाशीममध्ये राष्ट्रवादीचा झेडपी अध्यक्ष

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 जानेवारी 2020

अकोला ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीत अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाने आपला गड कायम ठेवला. तर वाशीम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली. अकोल्यात भारिपच्या प्रतिभाताई भोजने, तर वाशीममध्ये राष्ट्रवादीचे चंद्रकांत ठाकरे अध्यक्षपदी विराजमान झाले. 

अकोला ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीत अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाने आपला गड कायम ठेवला. तर वाशीम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली. अकोल्यात भारिपच्या प्रतिभाताई भोजने, तर वाशीममध्ये राष्ट्रवादीचे चंद्रकांत ठाकरे अध्यक्षपदी विराजमान झाले. 

अकोल्यात पुन्हा भारिपची सत्ता
अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह उपाध्यक्षपदी भारिपच्या सदस्यांची निवड झाल्याने या पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर भारिपच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. प्रतिभाताई भोजने यांची अध्यक्षपदी तर सावित्री राठोड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दुपारी तीनच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी भारिप व भाजपचे सदस्य सभागृहात पोहचले. भारिपच्या समर्थकांना सुरुवातीपासूनच विजयाचा विश्वास असल्याने जिल्हा परिषदेत दुपारी मोठी गर्दी झाली होती. 

भाजप ठरली किंगमेकर
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर गेल्या २० वर्षांपासून भारिपचे वर्चस्व राहलेले आहे. या वेळी जिल्हा परिषदेमध्ये भारिपचे २३ सदस्य निवडून आले होते. बहुमतासाठी आणखी चार सदस्यांची गरज होती. भारिपला सत्तेच्या दूर करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी मोट बांधली. तरीही दोघांकडेही बहुमताची संख्या नव्हती. संपूर्ण निर्णय हा भाजपच्या पाठबळावर टिकून होता. भाजप सदस्य तटस्थ भूमिका घेत मतदान सुरू असताना सभागृहातून बाहेर पडले. त्यांचे बाहेर जाणे भारिपसाठी फायदेशीर ठरले व महाविकास आघाडीच्या स्वप्नावर पाणी फेरल्या गेले. सभागृहातून बाहेर पडलेली भाजप खरी ‘किंगमेकर’ ठरली. दोन दिवसांपूर्वी ‘ॲग्रोवन’ने याबाबत दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले. 

वाशीममध्ये महाविकास आघाडी
वाशीम जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्षपदाची निवड शुक्रवारी झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे अध्यक्ष तर काँग्रेसचे डाॅ. श्‍याम गाभणे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेमध्ये ५२ सदस्यसंख्या आहे. निवडणुकीमध्ये प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले. मात्र, निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी राज्याप्रमाणे जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा झाला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी चंद्रकांत ठाकरे, तर उपाध्यक्षपदासाठी डाॅ. गाभणे यांचेच अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
 


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...