Agriculture news in Marathi, Akot, Telhara off for 'Wan' water | Agrowon

‘वान’च्या पाण्यासाठी अकोट, तेल्हारा बंद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

अकोला ः जिल्ह्यातील वान प्रकल्पातील पाणी अकोला महानगराला देण्यास विरोध दर्शवीत मंगळवारी (ता. १०) अकोट व तेल्हारा तालुक्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्त बंद पाळला. या बंदला या दोन्ही तालुक्यांतील बहुसंख्य गावांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. एकीकडे नागरिकांचा विरोध वाढत चाललेला असताना लोकप्रतिनिधी मात्र अद्याप यापासून स्वतःला दूर ठेवत आहेत. सर्वपक्षीय नागरिक मात्र यामध्ये आता हिरिरीने सहभागी होत असल्याचे या आंदोलनाने दाखवून दिले.

अकोला ः जिल्ह्यातील वान प्रकल्पातील पाणी अकोला महानगराला देण्यास विरोध दर्शवीत मंगळवारी (ता. १०) अकोट व तेल्हारा तालुक्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्त बंद पाळला. या बंदला या दोन्ही तालुक्यांतील बहुसंख्य गावांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. एकीकडे नागरिकांचा विरोध वाढत चाललेला असताना लोकप्रतिनिधी मात्र अद्याप यापासून स्वतःला दूर ठेवत आहेत. सर्वपक्षीय नागरिक मात्र यामध्ये आता हिरिरीने सहभागी होत असल्याचे या आंदोलनाने दाखवून दिले.

तेल्हारा तालुक्यात असलेल्या वारी हनुमान येथील वान प्रकल्पातून तब्बल २४ दलघमी पाणी अकोला महानगरासाठी आरक्षित करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांमधून विरोध सुरू झाला आहे. वान प्रकल्प सिंचनाच्या उद्देशाने निर्माण झालेला असून तेल्हारा, संग्रामपूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यांसाठी गेल्या आहेत. आजपर्यंत मोजकेच वर्ष सिंचन झाले. 

गेल्या काही वर्षांत या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी विविध पाणीपुरवठा योजनांसाठी वापरले जात आहे. आता अकोल्याला २४ दलघमी पाणी आरक्षित केल्यास सिंचनालाही पाणी मिळणार नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये तयार झाली. वान प्रकल्प हा ८३.४७ दलघमी क्षमतेचा आहे. अकोला शहरासह सध्या सुरू असलेल्या योजनांसाठी  ५७.८७ दलघमी पाणीसाठा राखीव झाला आहे.

इतर बातम्या
मराठवाड्यात २७१ मंडळांमध्ये बरसला पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...
कांदा दरस्थिती आढाव्यासाठी केंद्राचे...नाशिक : कांदा दर, आवक स्थितीचा आढावा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...