agriculture news in marathi, alert for cold wave in Vidharbha | Agrowon

विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 31 जानेवारी 2019

पुणे : उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल ६ ते ८ अंशांची घट झाल्याने थंडीची लाट आली आहे. बुधवारी (ता. ३०) सकाळी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ३१) राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याबरोबच विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

पुणे : उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल ६ ते ८ अंशांची घट झाल्याने थंडीची लाट आली आहे. बुधवारी (ता. ३०) सकाळी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ३१) राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याबरोबच विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

 हिमालय पर्वत आणि लगतच्या परिसरात असेलेल्या पश्चिमी चक्रावाताच्या स्थितीमुळे या भागात हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. या भागात वाहणारे थंड वारे देशाच्या सपाट भूभागाकडे येत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड राज्यात थंडीची लाट आली आहे. वाऱ्याच्या दिशेमध्ये होत असल्याने दोन दिवस मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये, तर आज (ता.३१) विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोमवारपासून (ता.४) मध्य भारतात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. ३०) सकाळी पूर्व राजस्थानच्या भिलवाडा येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर राज्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सलग दुसऱ्या दिवशी ४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ४ अंश सेल्सिअस, तर नागपूर येथे ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नगर, जळगाव, मालेगाव, नाशिक, औरंगाबाद, परभणी, अकोला, गोंदिया, यवतमाळ, वर्धा येथे किमान तापमान ७ अंशांच्या आसपास होते.  

बुधवारी (ता. ३०) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ८.२ (-३.३), नगर ६.७ (-५.८), जळगाव ६.४ (-६.१), कोल्हापूर १५.५ (-०.१), महाबळेश्‍वर ११.६ (-२.३), मालेगाव ७.४ (-३.५), नाशिक ७.६, सांगली १३.० (-१.४), सातारा ११.६ (-१.४), सोलापूर ११.७(-५.१), सांताक्रुझ १५.४(-२.१), अलिबाग १६.७(-१.०), रत्नागिरी १९.७(०.६), डहाणू १५.२(-२.२), आैरंगाबाद ७.०(-५.६), परभणी ७.५ (-७.७), नांदेड ८.० (-६.८), उस्मानाबाद १०.६, अकोला ७.०(-७.८), अमरावती ८.०(-७.३), बुलडाणा ८.२ (-७.५), चंद्रपूर ८.२(-७.३), गोंदिया ६.५(-७.८), नागपूर ४.६(-९.५), वर्धा ७.४(-६.९), यवतमाळ ७.४(-८.८).


इतर अॅग्रो विशेष
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...
महिनाभरात पडणार नाशिक विभागातील साखर...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा ३२ पैकी केवळ...
महिलांनी मालक बनले पाहिजे ः राज्यपालमुंबई ः महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे...
कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी...मुंबई ः दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी...
ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न का वाढत नाही...पुणे: देशात ५० टक्के रोजगार हा शेतीशी निगडित व...
नागपूर : थंडीची तीव्रता वाढली; अंडी...नागपूर ः थंडीच्या दिवसांत मागणी वाढत अंड्यांचे...
निफाडला २.४ अंश तापमान; राज्य थंडीने...पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या...
शेतात नवे प्रयोग करणारे शेतकरी आमचे...मुंबई ः प्रत्यक्ष शेतात राबून नवनवीन प्रयोग...
चिखलदऱ्याच्या स्ट्राॅबेरीला हवाय...अमरावती ः लागवड खर्चाच्या दुप्पट उत्पन्न मिळवून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १८ लाख टन...औरंगाबाद: मराठवाड्यातील औरंगाबाद साखर सहसंचालक...
कमी खर्चातील गांडूळखतनिर्मिती तंत्राचा...अंबेजोगाई (जि. बीड) येथील शिवाजी खोगरे यांनी कमी...
आरोग्यदायी अन्ननिर्मितीबरोबरच जपली...धानोरा- भोगाव (जि. हिंगोली) येथील दादाराव राऊत आठ...
पशुधन विकासाची वसाहत वाटपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाची...
रस्ते की मृत्यूचे सापळेआपला देश संपूर्ण विश्वात रस्ते अपघातात अव्वल आहे...
फलोत्पादन योजनांमध्ये बदलास केंद्र तयार पुणे: “फलोत्पादनातील उत्पन्नवाढीसाठी सध्याच्या...
शेतीसाठी आवश्‍यक ते सर्वकाही करणार :...माळेगाव, जि. पुणे ः कमी पाणी व कमी जागेत अधिक...
कलिंगड शेती ठरते आहे फायदेशीरअकोला ः मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी पुणे ः राज्यातील थंडीत चढउतार सुरू आहे. मध्य...
हमीभावाच्या संदर्भात वायदे बाजारावरही...लातूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी...