यवतमाळ : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे कोरडवाहू पट्ट्यातील कापूस उत्पादक शेतकरी पुन
अॅग्रो विशेष
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
पुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती येथे देशातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान ठरले आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २९) विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर शनिवारी (ता. ३०) पूर्व विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार गेल्याने उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार गेले आहे. यात जळगाव, सोलापूर, परभणी, अकोला, चंद्रपूर, वर्धा येथे तापमान ४१ अंशांच्या वर गेले आहे. तर नांदेड, ब्रह्मपुरी, वाशीम, यवतमाळ येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. कोकणातही चटका चांगलाच वाढला असून, सातांक्रूझ येथे सरासरीपेक्षा तब्बल ६.७ अंश, तर अलिबाग येथे ५.५ अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्याच्या कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
शुक्रवारपर्यंत (ता. २९) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपासून पावसाला पोषक हवामान होत असल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा आणि परिसरात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
बुधवारी (ता. २७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.३ (३.०), धुळे ३९.४, जळगाव ४१.० (२.२), कोल्हापूर ३७.४ (०.७), नाशिक ३८.० (२.०), सोलापूर ४१.२ (२.५), आलिबाग ३६.५ (५.५), रत्नागिरी ३३.२(१.६), औरंगाबाद ३८.६ (२.१), परभणी ४१.५ (३.२), नांदेड ४०.० (१.४), अकोला ४१.४ (३.१), अमरावती ४२.६ (४.३), बुलडाणा ३७.६ (२.७), बह्मपुरी ४०.० (२.३), चंद्रपूर ४१.२ (२.१), गडचिरोली ३८.६ (०.४), गोंदिया ३६.८ (-०.६), नागपूर ३९.८ (२.२), वाशिम ४०.०, वर्धा ४१.२ (३.२), यवतमाळ ४०.६ (३.१).
- 1 of 656
- ››