agriculture news in marathi, alert for heatwave in Vidharbha, Central Maharashtra, Marathwada | Agrowon

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 एप्रिल 2019

पुणे : कोकण वगळता उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे गेले अाहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. अकोला येथे तापमानात आणखी वाढ होत रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये हंगामातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारपर्यंत (ता. ३) विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पुणे : कोकण वगळता उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे गेले अाहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. अकोला येथे तापमानात आणखी वाढ होत रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये हंगामातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारपर्यंत (ता. ३) विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

 तापमान ४० अंशांपेक्षा अधिक असेल आणि सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाली असेल, तर उष्णतेची लाट समजली जाते. त्यानुसार रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाना, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, सौराष्ट्र आदी राज्यांत काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. पश्चिम मध्य प्रदेशातील खारगोणे येथे सलग दुसऱ्या दिवशी देशातील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, परभणी, साताऱ्यात उष्णतेची लाट आली आहे. 

राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा खुपच वाढला आहे. परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे गेला आहे. तर धुळे, जळगाव, नांदेड, बीड, यवतमाळ ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. आजपासून (ता. १) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका कायम राहणार आहे.  

रविवारी (ता. ३१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.८ (४.१), धुळे ४२.०, जळगाव ४२.६ (३.०), कोल्हापूर ३७.७ (१.१), महाबळेश्वर ३४.१ (२.६), नाशिक ३९.७ (३.१), सांगली ३८.४ (०.८), सातारा ४०.४ (४.६), सोलापूर ४१.७ (२.९), आलिबाग ३१.२ (-०.१), डहाणू ३२.८ (०.८), सांताक्रूझ ३१.४ (-१.९), रत्नागिरी ३२.६ (०.८), औरंगाबाद ४०.६ (३.५), परभणी ४३.२ (४.५), नांदेड ४२.० (३.१), बीड ४२.१ (४.२), अकोला ४३.६ (४.९), अमरावती ४३.२ (४.६), बुलडाणा ३८.५ (३.०), बह्मपुरी ४०.९ (२.५), चंद्रपूर ४३.१ (३.७), गडचिरोली ४१.० (१.२), गोंदिया ४०.४ (२.६), नागपूर ४३.३ (५.२), वाशीम ४१.०, वर्धा ४३.४ (४.६), यवतमाळ ४२.२ (४.२).

इतर अॅग्रो विशेष
अनुदान नव्हे; योगदानच वाचवेल शेतीलावातावरण बदल आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा अथवा कडक...
साखर निर्यातीची सुवर्णसंधीपावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ शकलेल्या साखर...
कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय? यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी...
कंपोस्ट खते बनविण्याच्या पद्धतीजमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा...
एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका:...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची...औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून...
आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासूनपुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी)...
राज्यात पीकहानी ७० लाख हेक्टरच्याही...पुणे : केंद्र शासनाला पाठविल्या जाणाऱ्या अहवालात...
राज्यात गारठा वाढला; नगर १२.१ अंशावरपुणे : किमान तापमानात घट होत असल्याने राज्यात...
साखर कारखान्यांसाठी कर्ज परतफेडीचा...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने साखर कारखान्यांसाठी...
दोडका पिकाने उंचावले अर्थकारणधामणखेल (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील चंद्रकांत...
पेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटापुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या...
जळगावचे उडीद मार्केट यंदा पोचले...उडीद उत्पादनात खानदेश अग्रेसर आहे. जळगावच्या...
पर्यायाविना निर्णय घातकच! ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक...
नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही...
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...
हमीभावाने कापूस खरेदी २० नोव्हेंबरपासून...जळगाव : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व...
बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळापुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील...