agriculture news in Marathi Alibaugh Onion may got GI Maharashtra | Agrowon

अलिबागचा पांढरा कांदा ‘जीआय’च्या वाटेवर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

पुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अलिबाग पांढरा कांदा शेतकरी उत्पादक गटातर्फे त्यासाठी करण्यात आलेला प्रस्ताव चेन्नई येथील ‘जीआय रजिस्ट्री’कडून स्वीकारण्यात आहे. प्रस्तावात देण्यात आलेल्या मुद्द्यांचे तांत्रिक मूल्यमापन झाल्यानंतर या कांद्याला जीआय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

पुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अलिबाग पांढरा कांदा शेतकरी उत्पादक गटातर्फे त्यासाठी करण्यात आलेला प्रस्ताव चेन्नई येथील ‘जीआय रजिस्ट्री’कडून स्वीकारण्यात आहे. प्रस्तावात देण्यात आलेल्या मुद्द्यांचे तांत्रिक मूल्यमापन झाल्यानंतर या कांद्याला जीआय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

पुणे येथील ‘जीएमजीसी’ कंपनीचे प्रमुख व भौगोलिक निर्देशांक (जीआय) विषयातील तज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की अलिबागचा पांढरा कांदा वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो. चवीला अन्य कांद्यापेक्षा गोड, टिकाऊ अशी त्याचे वैशिष्ट्ये आहेत. महिलांकडून कुशलतेने या कांद्याची माळ किंवा वेणी केली जाते व ती प्रसिद्ध आहे. अलिबाग भागातील हे पारंपरिक बियाणे आहे. भातकाढणी झाल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत ओलाव्याच्या आधारे हा कांदा लावण्यात येतो. 

जागतिक बाजारपेठेत संधी 
हिंगमिरे म्हणाले, की रायगडचे पांढरे सोने म्हणूनच या कांद्याला ओखले जाते. या बहुगुणी कांद्याला जीआय मिळाल्यास भारतातील विविध राज्यांबरोबरच परदेशांतही त्याला बाजारपेठ मिळण्याची मोठी संधी आहे. रायगड कृषी विभाग- आत्माअंतर्गत प्रकल्प अधिकारी दिनेश शेळके यांनी या कांद्याच्या जीआयसाठी पुढाकार घेतला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील जितेंद्र कदम यांनीही त्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. मागील वर्षी २४ सप्टेंबरला अलिबाग पांढरा कांदा शेतकरी उत्पादक गटाची स्थापना आत्माच्या पुढाकाराने झाली.

त्यांच्यातर्फेच जीआयचा प्रस्ताव करण्यात आला आहे. 
यंदाच्या १६ जानेवारीला चेन्नई येथील ‘जीआय रजिस्ट्री’कडून तो स्वीकारण्यात आला आहे. या कांद्याबाबत सादर करण्यात आलेल्या वैशिष्ट्यांचे सर्व शास्त्रीय कसोट्यांवर मूल्यमापन होऊन मग त्याला जीआय प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल, असे हिंगमिरे यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...