क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास डॉ. विश्वनाथा यांची भेट

क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास डॉ. विश्वनाथा यांची भेट
क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास डॉ. विश्वनाथा यांची भेट

कोल्हापूर : शिरोळ येथील दत्त कारखान्याच्या माध्यमातून शेडशाळ येथील क्षारपड जमीन व आलास येथील ११०० एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन योजना राबवण्यात येत आहे. या योजनेस महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी भेट दिली. डॉ. शरद गडाख डायरेक्टर ऑफ रिसर्च हे या वेळी उपस्थित होते. 

डॉ. विश्वनाथा म्हणाले, ‘‘सार्वजनिकरीत्या शेतकऱ्यांच्या सहभागातून क्षारपड जमीन सुधारणा ही योजना पाहून आनंद झाला. शेतकऱ्यांना क्षारपड जमीन बाबतचे महत्त्व जाणून त्यांना एकत्र करून ही जमीन सुधारणा करणे ही सामान्य गोष्ट नाही. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती असताना तेथील शेतीला, जनावरांना आणि माणसांना पिण्यासाठी पाणी नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. याठिकाणी पूर्वी अति पाण्यामुळे शेती क्षारपड झालेली आहे व ती अत्यंत नापिक झालेली आहे.’’ 

या वेळी कारखान्याच्या शेती विभागाने तयार केलेला प्रोजेक्ट रिपोर्ट दाखविण्यात आला. शंकाचे निरसन करण्यात आले. डॉ. विश्वनाथा यांनी शेडशाळ येथील सेंद्रिय शेतीचीही पाहणी केली. शेडशाळ व आलास येथील शेतकऱ्यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार केला. डॉ. गजानन खोत, बसवराज मास्तोळी, डॉ. सुनील गोरन्टीवार, डॉ. दिलीप खटमाळे, डॉ. भीमराव कांबळे, श्रीमंत राठोड, डॉ. बी. एस. रास्कर, डॉ. जमदग्नी, उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, विश्वनाथ माने, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com